Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याअकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून

अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून

मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर( After the cancellation of the eleventh CET exam in the state ) आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ( Eleventh admission schedule ) शिक्षण विभागाने जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने (Central online admission system ) करण्यात येणार आहेत. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.

- Advertisement -

या प्रवेश प्रक्रियेला उद्या 14 ऑगस्ट सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे. अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी स्वत:चा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करुन नोंदणी करु शकणार आहेत. नियमित प्रवेशाचा पहिला राऊंड 22 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. उद्यापासून 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ते 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग 2 भरावा लागणार आहे.

25 ऑगस्टला या संदर्भातील पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर जे पसंती क्रमांक मिळाले आहेत त्यानुसार 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळालें आहे हे कळेल.

त्यानंतर 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आपले कॉलेज निश्चित करायचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंत नसेल तर 30 ऑगस्टला संध्याकाळी 10 वाजता रिक्त जागांबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल.

अशाप्रकारे पहिल्या गुणवत्ता यादीबाबत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलें आहे. काही दिवसांनतर दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यापुढचें वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या