Friday, April 26, 2024
Homeनाशिकनवागतांच्या स्वागताला सर्जा-राजाही आले

नवागतांच्या स्वागताला सर्जा-राजाही आले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून पुन्हा प्राथमिक शाळा सुरु झाल्या. यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आज अनेक तऱ्हेने नवागतांचे स्वागत करण्यात आले…

- Advertisement -

जि. प. शाळा कोणे (ता. त्रंबकेश्वर) येथे पहिली ते चौथीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून गावातून सवाद्य मिरवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिठाईचे वाटप देखील करण्यात आले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरवरचा आनंद दिसून आला.

यावेळी मुख्याध्यापक विजय जगदाळे, सुभाष अहिरे, ज्ञानेशवर कोकर्डे, ओमप्रकाश पुपलवाड, शाहिदास गांगुर्डे, आनंदा मोरे, मेघा साठे, तेजस्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.

जि. प. प्राथमिक शाळा दहिवड (ता. देवळा जि. नाशिक) येथे देखील विद्यार्थ्यांचे सजवलेल्या बैलगाडीतून प्रभातफेरीद्वारे शाळेत प्रवेश देण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सरपंच, उपसरपंच, पालक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या