Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रइलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करून कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईला अटक

इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा वापर करून कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईला अटक

पुणे |प्रतिनिधी| Pune

लोहमार्ग पोलिसांच्या (Railway Police) लेखी परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा (Electronics Gadget in Written Test) वापर करण्यास परवानगी (Permission) नसताना गॅझेटद्वारे कॉपी (Copy by Gadget) करणाऱ्या मुन्नाभाईला स्वारगेट पोलिसांनी अटक (Swargate Police Arrested) केली आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस परीक्षा आता वादात सापडली आहे.

- Advertisement -

जीवन फंडुसिंग गुणसिंगे (रा. वैजापुर, औरंगाबाद) असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुणसिंगे हा लोहमार्ग परीक्षा गॅझेटद्वारे मित्राशी बोलून तो प्रश्न पत्रिकेमधील प्रश्नांचे उत्तर लिहून घेत होता. मुन्नाभाई चित्रपटातील (Film) नायक देखील अशाप्रकारे कॉपी करत होता. पण खऱ्या आयुष्यातील या मुन्नाभाईला जेलची हवा खावी लागली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस भरतीसाठी (Railway Police Recruitment) रविवारी (17 ऑक्टोबर) लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गुलटेकडी येथील कटारिया हायस्कूलमध्ये असलेल्या केंद्रामध्ये जीवन गुणसिंग याचा परीक्षेसाठी नंबर आला होता. तो दुपारी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्यासाठी गेला. यावेळी तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याने जवळ कोणतीही वस्तू नसल्याचे सांगितले होते.

गुणसिंगने परीक्षा सुरु झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईद्वारे मित्राला संपर्क साधला. मित्राला प्रश्न सांगून त्याच्याकडून उत्तर ऐकून लिहित होता. उत्तरे लिहित असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी गॅझेट जप्त (Police Seize Gadget) करुन त्याला अटक केली. हे एक इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस असून त्यामध्ये सिमकार्ड टाकून कॉल करण्याची सोय होती. याद्वारे तो कॉपी करत होता. पोलीस या प्रकरणी आणखी काही आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक औरंगाबादकडे (Aurangabad) रवाना करण्यात आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या