Thursday, April 25, 2024
Homeनगरविद्युतदाहिनी सुरू, सुरक्षा रक्षकही नियुक्त

विद्युतदाहिनी सुरू, सुरक्षा रक्षकही नियुक्त

अमरधामच्या सुरक्षेसाठी महापालिका सरसावली

अहमदनगर (प्रतिनिधी) – अमरधामची अवस्था उघड झाल्याने महापालिका प्रशासनाने तेथील सोयीसुविधांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत असलेले विद्युत दाहिनीतील एक युनिट सुरू करण्यात आले असून दररोज स्वच्छता व साफसफाई करण्यात येत आहे.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांपूर्वी अमरधाम येथे अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी बाहेर आढून काढला होता. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. काही स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत महापालिका प्रशासनान बाबत संताप व्यक्त केला होता. दिवसेंदिवस अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी कमी लोखंडी जाळ्या कमी पडत आहे. त्यातच अमरधाम येथे मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.

तर गेल्या काही महिन्यापासून विद्युत दाहिनीदेखील बंद अवस्थेत असल्याचे मागील घटनेमुळे हे प्रश्न समोर आले. या प्रकराची महापालिका प्रशसानाने तातडीने गंभीर दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. दररोज अमरधामची स्वच्छता करा, सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश देत प्रस्तावित केलेल्या विविध सोयीसुविधांसाठीची मोजमापेही घेतली. गेल्या दोन दिवसात बंद विद्युत दाहिनीची दुरुस्ती वेगाने हाती घेत दोनपैकी एक विद्युतदाहिनी सुरू केली गेली तसेच दुसर्‍या विद्युतदाहिनीचे नवे साहित्यही आले असून, तिचीही दुरुस्ती सुरू केली गेली आहे. तेथे सुरक्षा रक्षक हजर झाले असल्याचे समजते.

दरम्यान अमरधाम येथे अमरधाममध्ये अनाथ व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचे नाव-गाव यांची माहिती कोणाला नसते. त्यामुळे शहर हद्दीतील बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने सरकार सर्व्हिसेस या संस्थेला दिला आहे. हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश संबधित संस्थेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरासाठी एकमेव असलेल्या नालेगावातील अमरधाममध्ये रोजच अनेकांचा अंत्यविधी होतो. रात्री काही उपद्रवी लोकांचा येथे नियमित वावर असतो. त्यामुळे येथे कायमस्वरूपी सुरक्षा नेमण्याची गरज आहे.

– सागर लोखंडे

- Advertisment -

ताज्या बातम्या