Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारभारनियमनला व कर्जबाजारीला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या

भारनियमनला व कर्जबाजारीला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील आसाने येथील शेतकरी (farmers) समाधान हिरामण पाटील (वय38) यांनी सततची नापिकी,रोजचे विजेचे भारनियमन (Electricity load regulation),बँकेचे कर्ज फेडू (tired of debt) न शकल्याने घरातच गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची दुखद घटना घडली आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वपट्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झाले नाही.विहिरींना जेमतेम पाणी आहे. अशातच विजेचे रोज रात्रीचे भारनियमन गेल्या 2 महिन्यापासून अक्राळे सबस्टेशन अंतर्गत आठ दिवसाआड पूर्ण रात्रीचे भारनियमन चालू आहे.

रात्री 12.30ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत भारनियमन चालु आहे.दरम्यान नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथील येथील शेतकरी समाधान हिरामण पाटील (वय38) यांच्या शेतातील पिके ही कोमजू लागली.

अशातच वारंवार लाईट ये जा करत असल्याने विद्युत पम्प दोन वेळा नादुरुस्त झाला.आई वडील गेल्यानंतर 3 बहिणींचे लग्न याच भावाने केले. त्यामुळे डोक्यावर युनियन बँक ऑफ इंडियाचे बँकेचे कर्ज झाले.

कर्ज फेडू शकला नाही.सततची नापिकी,भारनियमनामुळे रोजचे जागरण,वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आदी कारणामुळे नैराश्य आल्याने समाधान पाटील याने आज दि.5 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेतला.

सदर शेतकर्‍याच्या पाश्चात्य 3 बहिणी पत्नी 12 वर्षांचा एक मुलगा,व 14 वर्षाची एक मुलगी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या