विज बिल भरणा केंद्रात २७ लाखाचा अपहार

jalgaon-digital
1 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी- Nandurbar

नंदुरबार शहरातील विज वितरण कंपनीच्या विज बिल भरणा केंद्रात ग्र ग्राहंकांनी भरलेले २६ लाख ८८ हजार ८९२ रूपये सहाय्यक लेखापाल याने दिड वर्ष झाले तरी बँकेत भरणा न केल्याने त्याच्याविरूध्द नंदुरबार शहर पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार शहरातील म.रा.वि.वि. कंपनी मर्यादित अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग यांच्या कार्यालयात जितेंद्र ठाकरे सहाय्यक लेखापाल या पदावर कार्यरत असतांना कार्यालयात विज भरणा केंद्रामार्फत ग्राहकांकडून विजबिल वसुलीची ६ लाख ८८ हजार ८९२ रूपये ही देना बँकेत भरणा करणे आवश्यक असतांना,

जितेंद्र ठाकरे याने मे २०१ ९ ते सप्टेंबर २०१ ९ या कालावधीत कार्यालयीन विजबिल वसुलीची रक्कम देना बँकेत जमा न केल्याने अतिरीक्त अभियंता धिरज अजबराव दुपारे यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र गुलाब ठाकरे यांच्या विरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोनि रविंद्र कळमकर करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *