Friday, April 26, 2024
Homeजळगावविद्युत कर्मचारी संघटना खाजगीकरणा विरोधात आक्रमक

विद्युत कर्मचारी संघटना खाजगीकरणा विरोधात आक्रमक

फेकरी,Fekri ता. भुसावळ|वार्ताहर

केंद्रीय कार्यकारिणी Central Executive नागपूर यांच्या आदेशान्वये १० रोजी दिपनगर Dipnagar शाखेच्यावतीने ५०० मेगावॅट प्रवेशद्वारासमोर संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये वीज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण Privatization of power distribution companies प्रस्तावित करणार्‍या विद्युत विधेयक २०२१ Electricity Bill 2021 ला जोरदार विरोध objection करण्यात आला.

- Advertisement -

प्रसंगी मार्गदर्शन करताना संघटनेचे अध्यक्ष मिलिंद खंडारे यांनी सांगितले की, अखिल भारतीय स्वतंत्र विद्युत कर्मचारी महासंघाने १०ऑगस्ट २०२१ रोजी वीज (सुधारणा) विधेयक – २०२१च्या विरोधात काम बंद आंदोलनाची नोटीस दिली होती.

कारण हे दुरुस्ती विधेयक अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घटनात्मक अधिकारांच्या विरोधात आहे. वीज वितरण कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या दिशेने जाईल यामुळे समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विविध राज्य सरकारांनी दिलेली सबसिडी कमी होईल. यामुळे एससी/एसटी/ओबीसीला रोजगाराची संधीही बंद होईल.

पुढे कार्याध्यक्ष रोशन वाघ यांनी सांगितले की, काल केंद्रीय ऊर्जामंत्री माननीय आर. के. सिंग यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित केले असूनअखिल भारतीय स्वतंत्र विद्युत कर्मचारी महासंघाने ए.आय.आय.व्ही.ई.एफ.हे देखील ठरवले आहे की, जर केंद्र सरकारने विश्रांतीच्या कामाच्या दिवशी म्हणजे ११, १२ किंवा १३ तारखेला संसदेच्या कोणत्याही सभागृहात जबरदस्तीने विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला तर स्थगित केलेले आंदोलन पुनश्च सर्वशक्तीनिशी उभारले जाईल. याकरिता सर्व पदाधिकारी सभासद व कामगार बांधवांनी आंदोलनासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले.

प्रसंगी संघटनेचे सचिव अत्तर तडवी, प्रमुख सल्लागार एम. एम. पागवाड, संघटन सचिव विजय वाघ, उपाध्यक्ष प्रशांत वाघ, प्रसिद्धीप्रमुख मनोज जमदाडे, सहसचिव नितीन सोनवणे, दीपक बागुल, मुकेश मोरे, मनोहर बार्‍हे, डि. के. गवळी, अरुण भागीरथ, गिरीश राऊत, कुंरदास जाधव, गोपाल इंगळे यांच्यासहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या