Thursday, April 25, 2024
Homeनगरविद्युतवाहक तारेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा मृत्यू !

विद्युतवाहक तारेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा मृत्यू !

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारात विद्युतवाहक तारेचा शॉक बसल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकरी जखमी झाला आहे. शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

अस्तित्व गमावून बसलेल्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याची गरज काय?

चिंचोली गुरव येथील शेतकरी सुरेश किसन सोनवणे हे आपल्या 2 बैलांसह शनिवारी दुपारी 2.30 ते 3 वाजेच्या दरम्यान जनावरांना चारा आणण्यासाठी बैलगाडी घेवून शेतात जात असतांना रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युतवाहक तारेचा शॉक बसून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर शेतकरी सुरेश सोनवणे हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गावातीलच खाजगी एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरत-हैद्राबाद महामार्गाच्या भूमापन प्रक्रियेस खडांबेत विरोध

या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. कामगार तलाठी अमोल गडाख यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. सदर दुर्घटनेतील शेतकर्‍यास शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी चिंचोली गुरव ग्रामपंचायतचे सदस्य बाबासाहेब सोनवणे व सामाजिक कार्यकर्ते सचिन आभाळे यांनी यांनी केली आहे.

राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

- Advertisment -

ताज्या बातम्या