Friday, April 26, 2024
Homeनगरविद्युत तारा चोरणार्‍या दोन टोळ्या जेरबंद

विद्युत तारा चोरणार्‍या दोन टोळ्या जेरबंद

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर भागात विद्युत टाँवरवरील ताराची चोरी करणार्‍या दोन टोळ्यांना मुद्देमालासह पकडले असुन त्यांच्याकडून एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे .

- Advertisement -

मारुती हौसीराम जाधव (23, रा. तिरडा ता. अकोले जि.अ.नगर), सुयोग अशोक दवंगे (19, रा. हिवरगांव पावसा ता. संगमनेर), अनिकेत कारभारी शिंदे (21, रा. घोटी ता. इगतपुरी जि.नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या टोळक्यांची नावे असून त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनला वासुंदे गावामधे चार ते पाच व्यक्ती हे विद्युतपारेशन कंपनीचे अंर्तगत बसविण्यात आलेल्या टॉवर वरील विद्यूत तारांची चोरी करीत आहेत. अशी मिळालेल्या गोपनीय बातमी वरुन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकुर व त्यांच्या पथकास गावामधे विदयुतटॉवर परीसरात पेट्रोलींग करण्यास सागितले होते. त्यानुसार वासुंदे गावामधे पेट्रोलींग करीत असताना टॉवर क्र.- 179 ते 180 मधे चार पाच व्यक्तीे टॉवरवरील तारांची चोरी करीत असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने टॉवर वरील तारांची चोरी करणार्‍या 3 जणांना पकडुन त्यांचे कडुन 60 हजार रूपये किंमतीची 800 मिटर अ‍ॅल्युमिनियम तार व 30 हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रीक साहीत्य असा 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी घटना शुक्रवारी (दि.23) रोजी वासुंदे परिसरातच घडली. गावामधे तिन व्यक्ती टॉवर वरील इलेक्ट्रीक तारांची चोरी करीत आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी पथक पाठवून त्यांना पकडण्यास सांगितले. त्यानुसार वासुंदे गावामधे पथक गस्त घातल असताना टॉवर क्र. – 1176 ते 177 मधे तिन व्यक्ती टॉवर वरील तारांची चोरी करीत असल्याचे निदर्शनास आले. सहा. पो नि ठाकुर व त्यांचे पथकाने पाठलाग करून तीघांना पकडले. त्यांचेकडे तपासणी केली असतात 70 हजार रुपये किंमतीची अ‍ॅल्युमिनियम तार व 30 हजाराचे इलेक्ट्रीक साहीत्य असा 1 लाखा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दुसर्‍या प्रकरणात संतोष दादु दारोळे (रा. जोर्व नाका, बुद्ध विहार जवळ, ता संगनेर जि. अहमदनगर) जमीर इकबाल शेख व अमिर समीर शेख (रा. दोघेही जमजम कॉलनी 12 नं गल्ली सरकार लॉन्स शेजारी संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या