West Bengal assembly election results : तिसऱ्या फेरीतही ममता बॅनर्जी मागे, अधिकारी ८ हजार मतांनी आघाडीवर

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकालाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. बंगालमध्ये लक्ष लागून असलेल्या नंदुग्राममध्ये पहिल्या दोन्ही फेरीत शुभेंदू अधिकारी आघाडीवर आहे. दोन्ही फेऱ्यांमध्ये त्यांना ४५०० पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीत ही आघाडी ८ हजार मतांवर गेली.

kerala election results : LDF ने पार केला बहुमताचा आकडा

सकाळी १० वाजता मिळालेल्या कलानुसार, टीएमसी १३९ आणि भाजपा ११७ जागांवर आघाडीवर आहे. बंगालमधील एकूण १६१ जागांचे सुरुवातीचे कल सध्या हाती आले आहे. नंदीग्राममधून ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे सुवेंदू अधिकारी निवडणूक लढत आहेत. सुरवातीच्या कलांमध्ये सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. बहुमतासाठी १४८ चा जादूई आकडा गाठावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २११ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ४४, डाव्या पक्षांना २६ आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

पश्चिम बंगाल निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि ममता बॅनर्जींनी देखील नरेंद्र मोदी-अमित शाह यांना जोरदार टक्कर दिल्यामुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक चर्चेचा विषय ठरली.

काँग्रेस-लेफ्ट किंग-मेकर बनणार का?
बंगालमधील संपूर्ण निवडणुका मोदी विरुद्ध दीदींवर केंद्रित आहेत, पण ग्राऊंड रिपोर्ट्स आणि एक्झीट पोल असेही सूचित करतात की तृणमूल आणि भाजप दोन्ही ‘काँटे की टक्क’मध्ये बहुमताच्या मागे राहतील. अशा परिस्थितीत बंगालमधील सर्वात कमकुवत समजल्या जाणार्‍या डाव्या-कॉंग्रेसची युती किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकते

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *