Saturday, April 27, 2024
Homeजळगावसरपंच, उपसरपंचपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

सरपंच, उपसरपंचपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर!

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका झालेल्या 783 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. यासंदर्भात आदेश नोडल अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

- Advertisement -

सरपंचपदाची निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी असल्याने काही तालुक्यात दोन तर काही तालुक्यात तीन टप्प्यांत निवडणूक घेतली जाणार आहे. जळगाव तालुक्यात दोन टप्प्यात सरपंच उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात 15 रोजी 22 तर दुसर्‍या टप्प्यात 17 रोजी 19 ग्रा.पं.सरपंच उपसरपंच निवड करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

यंदा सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने आरक्षणापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट असल्याने केवळ औपचारिकता राहिली आहे. या निवडणुकीनंतर त्यावर शिक्कामेार्तब होणार आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रथम विशेष सभा घेण्यात येणार असून, या सभांमध्ये सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात येणार आहे.

जळगाव तालुक्यात दोन टप्प्यांत सरंपच, उपसरपंच निवड

तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीपैकी पहिल्या टप्प्यात 15 फेब्रुवारी रोजी 22 तर दुसर्‍या टप्प्यात 17 फेब्रुवारी रोजी 19 ग्रामपंचायतींंतर्गत सरपंच, उपसरपंच पदासांठी विशेष सर्वसाधारण सभा अध्यासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात शिरसोली प्र.बो, म्हसावद, आसोदा, आवार, कानळदा, कुसूंबा खुर्द, भादली बु., फुफनगरी, धानवड, भोकर, बोरनार, नांद्रा बु, सावखेडा, मोहाडी, रायपूर, जळगाव खु, फुफणी, वडली, वावडदा, शेळगांव, कानसवाडे, मन्यारखेडा, रिधूर, गाढोदा या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक सोमवार दि.15 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.

तर दुसर्‍या टप्प्यात शिरसोली प्र.न., ममुराबाद, तुरखेडा, वडनगरी, उमाळे देव्हारी, आव्हाणे, कंडारी, कठोरा, लमांजन-वाकडी-कुर्‍हाडदे, पिलखेडा, दापोरा, धानोरा बु-नागझिरी, चिंचोली, जवखेडे, रामदेववाडी, कडगांव, तरसोद, डिकसाई, नांद्रा खु. खापरखेडा अशा 19 ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच निवड बुधवार दि. 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. नशिराबाद येथे एकच सदस्य निवडून आलेला आहे. शिवाय नशिराबाद ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायतीची घोषणा करण्यात आलेली असल्याने तेथे सरपंच उपसरपंच निवड होणार नाही.

जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यात 76 ग्रापं.च्या सहा, पाचोरा तालुक्यात 97 तर जामनेर 73 तालुक्यात ग्रा.पं.च्या तीन तर यावल तालुक्यात पाच टप्प्यात सरपंच उपसरपंच निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडलेल्या ग्रामपंचायतींंची संख्या मोठी असल्याने सरपंच व उपसरपंचपदांची निवडणूक दोन किंवा अधिक सोयीनुसार टप्प्यांत घेण्याचे निर्देश तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. या सर्व निवडणूका कोवीड-19 संसर्ग आजाराबाबत शासन निर्देशानुसार सोशल फिजिकल डिस्टन्सिंग मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करूनच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रवींद्र भारदे, नोडल अधिकरी, तथा महसूल उपजिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या