Thursday, April 25, 2024
Homeनगरशिक्षक बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार- तांबे

शिक्षक बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार- तांबे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची येऊ घातलेली निवडणूक पूर्णपणे स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने आपण लढणार असून बँकेमध्ये केलेल्या चांगल्या कामामुळे आपल्या मंडळाला निश्चितपणे यश मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी मंडळाने केलेले चांगले काम आणि सभासदाभिमुख राबविलेले धोरण या जोरावर बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन गुरूमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी केले.

- Advertisement -

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मागील महिन्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गुरूमाऊली मंडळाची जिल्ह्याची आमसभा कोतूळ (ता. अकोले) येथे पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव पागिरे होते. व्यासपीठावर राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, जिल्हा गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुंदे, शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, कार्याध्यक्ष राजेंद्र सदगीर, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष अंजली मुळे, राज्य संघाच्या सदस्य विद्युलता आढाव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामचंद्र गजभार, तंत्र व शिक्षणसेवा मंडळाचे अध्यक्ष जयेश गायकवाड, पदवीधर शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राम वाकचौरे, मनोजकुमार सोनवणे, शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन गंगाराम गोडे, राजेंद्र रहाणे, सलीमखान पठाण, साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, बाळासाहेब मुखेकर, अर्जून शिरसाठ, बाबासाहेब खरात, संचालक किसनराव खेमनर, सुयोग पवार, रामेश्वर चोपडे, विठ्ठल काळे, साहेबराव टपळे, बाळासाहेब तापकीर, बाळासाहेब सरोदे, मच्छिंद्र लोखंडे, विजय नरवडे, किशोर माकोडे, अनिल टकले, अशोक गिरी, संतोष राऊत, किसन वराट, बाळासाहेब जर्‍हाड आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षक बँकेच्या चेअरमन निवडीच्या वेळी झालेल्या गोंधळाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. गेल्या साडेपाच वर्षांत या सर्व संचालक मंडळाने अतिशय चांगला, सभासद हिताचा, पारदर्शी कारभार केलेला आहे. ज्यांनी चेअरमन निवडीत गडबड केली, त्यांना योग्यवेळी त्यांची जागा दाखवून देऊ. त्यांच्यावर कारवाई करू, आगामी शिक्षक बँकेच्या निवडणुकीला एक दिलाने सामोरे जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या