Friday, April 26, 2024
Homeनगरआधी सोसायट्या, नंतर बाजार समित्यांच्या निवडणुका

आधी सोसायट्या, नंतर बाजार समित्यांच्या निवडणुका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित होऊन रणधुमाळी थंडावली आहे. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. मात्र ज्यांना बाजार समितीत काम करायचे आहे त्यांच्यापुढे सोसायटी आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याचे आव्हानही निर्माण झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात 2020 आणि 2021 मध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 250 विकास सोसायट्या असून खंडपीठाच्या आदेशानुसार आधी त्यांची निवडणूक होणार आहे.

मागील आठवड्यात औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायाधिश आर.एन. लड्डा यांच्या खंडपीठाने मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक बाजार समितीच्या निवडणुकी आधी घेण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या पणन विभागाने जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांचा कार्यक्रम आहे त्या स्थितीत थांबविण्याचे आदेश सहकार विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यात पारनेर, कर्जत, जामखेड आणि कोपरगाव बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरू होता. तर संगमनेर, राहाता, राहुरी आणि शेवगाव तालुक्यातील बाजार समित्याचा मतदार यादी कार्यक्रम सुरू होता. मात्र, आता खंडपीठाचे आदेश पणन विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम थांबविण्यात आलेला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या 814 आणि 2021 मध्ये मुदत संपलेल्या 436 विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. अशा प्रकारे 1 हजार 250 पैकी 175 ते 200 सोसायट्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत अथवा त्यांचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. मात्र, तरी 1 हजारांहून अधिक सोसायट्यांची मुदत संपलेली असून त्यांच्या निवडणूका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणूका होणार आहेत.

निवडणूक होणार्‍या सोसायट्या

संगमनेर 121, राहाता 66, कर्जत 61, पाथर्डी 78, जामखेड 43, राहुरी 100, शेवगाव 70, श्रीरामपूर 65, श्रीगोंदा 160, पारनेर 97, नेवासा 119, नगर 90, अकोले 78 आणि कोपरगाव 102 अशा आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या