Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशपाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

दिल्ली l Delhi

पाच राज्यात निवडणुका जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकार परिषदेला संबोधित करताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

- Advertisement -

पश्चिम बंगालमधल्या २९४ जागांसाठी, तमिळनाडूतल्या २३४ जागांसाठी, केरळामधील १४०, आसाममधील १२६ तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या ३० जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण ८२४ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. या पाच राज्यातील मतदानासाठी १८.६८ कोटी मतदार आहेत. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून २७ मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल तर सर्व राज्यांमधील मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.

केरळ, तमिळनाडूत आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ६ एप्रिलला मतदान होईल आणि २ मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल. तर आसामची निवडणूक ३ टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान २७ मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान १ एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान ६ एप्रिलला होईल.

तसेच करोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे करोना लसीकरण करण्यात येईल, असंही सुनील अरोरा यांनी सांगितलं आहे. मतदानाच्या वेळी पुरेसे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) तैनात करण्यात येणार आहे. सर्व महत्वाच्या, संवेदनशील मतदान केंद्रावर सीएपीएफ दलाची पुरेशी संख्या तैनात केली जाणार असल्याचंही निवडणुक आयुक्तांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांतील उमेदवारांना जास्तीत जास्त ३८ लाख रुपयांचा खर्च करता येईल तर पुदुच्चेरीच्या उमेदवारींना जास्तीत जास्त २२ लाखांचा खर्च करण्याची परवानगी असेल

- Advertisment -

ताज्या बातम्या