Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकइच्छुकांच्या नजरा प्रारूप मतदार याद्यांकडे

इच्छुकांच्या नजरा प्रारूप मतदार याद्यांकडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिका निवडणुकीसाठी ( NMC Elections ) मतदार याद्या ( Voters List )प्रसिध्दीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार येत्या 17 जून रोजी महापालिकेच्या वतीने प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. यामुळे इच्छुकांचा विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या नजरा 17 जूनकडे लागल्या आहेत.

- Advertisement -

राज्य निवडणुक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 17 जून रोजी मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर 17 ते 25 जून पर्यंत या यादीवर हरकती व सूचना घेण्यात येणार आहेत. या हरकती सुचनांवर सुनावणी झाल्यानंतर 7 जुलै रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यासाठी यंत्रणा कामास लागली असून मनपाचे सेवक प्रभाग निहाय मतदारांची विभागणी करणार आहे.

याचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले आहे. फक्त निवडणुक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा बाकी होती. आता आदेश प्राप्त झाले असल्याने आयोगाच्या निर्दशाप्रमाणे प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहिर करण्यात येणार आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा निवडणुकीची यादी तसेच 30 जून 2022 पर्यंतची अपडेट यादीचा यातील मतदारांचा यात समावेश करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या कर्मचार्‍याकडून आता प्रभाग निहाय मतदारांची विभागणी करून प्रभाग निहाय यादी तयार केली जाऊन ती 17 तारखेला प्रसिध्द केली जाणार आहे. मनपाच्या राजीव गांधी मुख्यालयासह सहाही विभागात विभागवार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर हरकती सुचनानंतर 7 जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या