Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याएकता कपूर त्र्यंबकेश्र्वर चरणी लीन

एकता कपूर त्र्यंबकेश्र्वर चरणी लीन

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshvar

प्रसिद्ध चित्रपट आणि टेलीविजन मालिका निर्माता निर्देशक एकता कपूर यांनी आज त्र्यंबकेश्वरी देवदर्शनार्थ भेट दिली.

- Advertisement -

20 सप्टेंबरला उज्जैन महाकालेश्वर मंदिरात त्यांनी दर्शन घेतले होते. आज श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत गोदावरीस कुशावर्त तीर्थावर वंदन केले.या प्रसंगी येथील प्रसिद्ध धनंजय शास्त्री अकोलकर व बंधूंनी त्यांचे पूजेचे पौरोहित्य करून आशीर्वाद दिले.

47 वर्षीय एकता कपूर यांची त्रंबकेश्वरवर धार्मिक श्रद्धा असून यापूर्वीही त्यांनी दोन-तीन वेळा येथे दर्शन घेतलेले आहे. देवदर्शन नंतर एका दुकानात जाऊन त्यांनी देवता मूर्ती खरेदी केल्या.सिने अभिनेते जितेंद्र यांची एकता कपूर कन्या असून बालाजी टेली फिल्मच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या