Friday, April 26, 2024
Homeनगरएकरूखेत बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा

एकरूखेत बिबट्याने पाडला बोकडाचा फडशा

एकरूखे |वार्ताहर| Ekrukhe

राहाता तालुक्यातील एकरुखे येथे बिबट्याचा मुक्त संचार असून बिबट्याने मंगळवारी रात्री शेतकरी गणेश कलगुंडे यांचा बोकड्या फस्त केला त्यामुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मंगळवारी रात्री अकराच्या सुमारात बिबट्याने कलगुंडे यांचा बोकड फस्त केला. त्यानंतर नारायण गाढवे यांच्या घराच्या ओट्यावर बसून रात्र काढली. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वैभव गाढवे व चेतन बागडे यांनी हा बिबट्या पाहिला. त्यांनी गाडीत बसून बिबट्याचे चित्रीकरण केले. हा बिबट्या गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात फिरत असल्याने गावातून अनेक तक्रारी वनविभागाकडे करण्यात आल्या.

मात्र वनविभागाने पिंजरा न लावल्याने घ्या बिबट्याने गावाकडे मोर्चा वळवला आहे. दोन महिन्यांंपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र भवर यांनी वनविभागाचे कर्मचारी गाढे यांना दूरध्वनीवरून संपर्क करून गावात पिंजरा लावण्याची मागणी त्यांच्याकडे केली. मात्र वनविभागाचे कर्मचारी गाढे यांनी पिंजरा देता येत नाही. तुम्ही थेट वनमंत्र्यांकडे तक्रार करा काही फरक पडत नाही अशी उर्मट भाषा वापरली. त्यामुळे वनविभागाच्या अरेरावीमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या