Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे-फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब?

शिंदे-फडणवीस पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब?

मुंबई | Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासून पुन्हा दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर (Delhi Tour) आहेत…

- Advertisement -

या दौऱ्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrutmahotsav) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत.

राज्यात अतिवृष्टीचा इशारा; नाशिकसह ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. तसेच निती आयोगाची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची अशीही संवेदनशीलता; महावितरणच्या कर्मचाऱ्याला तातडीने मदत

दरम्यान, नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अचानक दिल्लीला गेले होते. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने आता तरी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरतो का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या