Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदोन बांगलादेशी घुसखोरांसह आठ जणांना अटक

दोन बांगलादेशी घुसखोरांसह आठ जणांना अटक

मालेगाव । Malegoan

बनावट दस्तऐवज तयार करून हजार खोली भागात वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी नागरिकांसह त्याला बनावट पासपोर्ट आधार कार्ड शिधापत्रिका आधी दस्तऐवज तयार करून देणाऱे सहा जण अशा सात जणांना आयशा नगर पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

जहीर हाशिम हनिबा हा बांगलादेशी घुसखोर मात्र फरार झाला. या कारवाईने शहरात अवैधरित्या बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करीत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.

मुंबईत साकीनाका पोलिसांनी बनावट पासपोर्ट व इतर दस्तऐवजांच्या आधारे वास्तव्य करीत असलेल्या बांगलादेशी घुसखोरास अटक केली होती.

या कारवाईत मालेगावातील एम आय एम आमदार मौलाना मुफ्ती व काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांचे स्वाक्षरी असलेले लेटर हेड मिळून आल्याने शहरासह राज्यात खळबळ उडाली होती. मालेगाव शहरात देखील बांगलादेशी वास्तव्य करीत असतील असा संशय व्यक्त केला जात असल्याने पोलिस यंत्रणेने चौकशी सुरू केली होती आयशा नगर पो. नि. खगेन्द्र टेंभेकर यांना हजारो कुणी भागात 38 वर्षीय बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयशानगर पोलीस पथकाने सापळा लावून महामार्गावरील साई गोल्डन हॉटेल लगत आलम अमिन अंसारी या बांगलादेशीला ताब्यात घेत सखोल चौकशी केली. त्याने आपण बांगलादेशी असल्याची कबुली पोलिसांना दिली.

बनावट पासपोर्ट आधारकार्ड शिधापत्रिका जन्म प्रमाणपत्र आधी बनावट कागदपत्रे बनविण्यास मदत करणार्‍यांची नावे सांगतात पोलिसांनी कारवाई करत एकलाखअहमद मोहम्मद मुस्तफा रा. नयापुरा, इकबाल खान मुनिर खान रा. तंजीब नगर , इम्रान शेख रशीद. रा. नाग छाप झोपडपट्टी, ललीत मराठे रा. कैलास नगर, जाकिर अली अब्दुल मजीद खान रा. अख्तराबाद , व घर घेऊन देण्यात मदत करणारा अश्पाक शेख मुनाफ कुरेशी राहणार हजार खोली या सहा जणांना पोलिसांनी अटक केली.

या सातही जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पो. नि टेंभेकर, सपोनि गणेश गिरी हवा. राजेंद्र चौधरी, शाम पवार, योगेश ठाकूर, हेमंत देवरे, भरत पाटील, दीपक खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आलम अंसारी यांच्याकडून बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्मदाखला, डाकघर बचत बँक पासबुक, लोकप्रतिनिधींचे शिफारस पत्र अशी बनावट कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान पोलीस पथकाने विशेष मोहीम राबवत पवारवाडी भागातून ताहिर अली युसुफ अली वय 25 या बांगलादेशी घुसखोरास देखील सापळा लावून जेरबंद बंद केले आहे ताहीर अलीकडून मनपाचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

आलाम अन्सारी व ताहिर अली या घुसखोरांची पोलिसांतर्फे कसून चौकशी केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या