Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे अवैध दारूसह साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार येथे अवैध दारूसह साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार। प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार येथे दारूची चोरटी वाहतुक करणार्‍या वाहनासह 8 लाख 56 हजार 630 रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील दोंडाईचा रस्त्यावर असलेल्या हॉटेल गोपीकमल समोरून पांढर्‍या रंगाची चारचाकी (जी.जे.05-जेएम 5198) या गाडीतून मानवी जिवीतास अपायकारक अशी बनावट व विदेशी दारू चोरटी वाहतुक करतांना

पोलीसांना मिळून आली. पोलीसांनी 84 हजार 480 रूपये किंमतीचा 96 विदेशी दारूच्या बाटल्या 72 हजार 150 रूपये किंमतीचा 111 पोलिथीनच्या पिशव्यांची दारू 7 लाख रूपये किंमतीची चारचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी विकास अजगे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार

शहर पोलीस ठाण्यात कालूशेख गफ्फार रा.आडाजनपाटीया (सुरत) याच्याविरूध्द भादंवि कलम 328 सह महाराष्ट्र दारू कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई पी.पी.सोनवणे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या