Thursday, April 25, 2024
Homeनाशिकचंद्रदर्शन न झाल्याने ईद उल फित्र शुक्रवारी

चंद्रदर्शन न झाल्याने ईद उल फित्र शुक्रवारी

नाशिक | प्रतिनिधी

चंद्रदर्शन न झाल्याने ईद उल फित्र शुक्रवारी होणार असल्याची अधिकृत माहिती रात्री पावणे नऊ वाजेच्या दरम्यान खतीब -ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी केली.

- Advertisement -

दरम्यान, मुस्लिम बांधवांनी ईदची तयारी जवळपास पूर्ण केली आहे, लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद असल्यामुळे अत्यंत साध्या व धार्मिक पद्धतीने ईद साजरी होणार आहे.

अद्याप ईदगाह मैदानावर नमाजपठण होणार की नाही याबाबत भाविकांमध्ये चर्चा आहे. मात्र लॉक डाऊनमुळे कुठेही गर्दी होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज सायंकाळी मुस्लिम बहुल भागांमध्ये ईदचे चंद्र पाहण्यासाठी घरांच्या टेरेस वर तसेच इमारतींवर व उंचीच्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी तसेच महिला व पुरुष यांनी तसेच लहान मुलांनी गर्दी केली होती, मात्र चंद्र दर्शन न घडल्यामुळे एक रोजा वाढला व शुक्रवारी ईद साजरी होणार असल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या