Saturday, April 27, 2024
Homeनाशिकभर पावसात ईद-उल-अजहाची सामुदायिक नमाज पठण

भर पावसात ईद-उल-अजहाची सामुदायिक नमाज पठण

नाशिक । Nashik

आज शहर परिसरातील मुस्लिम बांधवांनी (Muslim Brotherhood) पवित्र ‘ईद -उल- अजहाचा (Eid-ul-Azha) मोठा सण उत्साहात साजरा केला. भर पावसात (rain) सकाळी दहा वाजेच्या सुमारास ऐतिहासिक शहाजानी ईदगाह मैदानावर (Idgah Maidan) मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण (Namaz recitation) केले. यावेळी देशात शांतता प्रस्थापित व्हावी, शांतता नांदावी, प्रत्येकाचा कल्याण व्हावा तसेच सर्व प्रकारचे आजार दूर व्हावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली….

- Advertisement -

इस्लाम धर्माचे ज्येष्ठ धर्मगुरु हजरत इब्राहिम अलेहसलाम (Hazrat Ibrahim Alehsalam) तसेच हजरत इस्माईल अलेहसलाम यांच्या पवित्र स्मृती प्रत्यार्थ पवित्र ‘ईद -उल- अजहाचा सण साजरा होतो. खतीब -ए- नाशिक (nashik) हाजी हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी नमाजचे नेतृत्व केले. तत्पूर्वी मौलाना महबूब आलम यांनी इस्लाम धर्म तसेच ईदचे महत्व विशद केले. आजारी असलेले समाजाचे धार्मिक नेते हाजी मीर मुखत अश्रफी आवर्जून मैदानावर उपस्थित होते. तसेच शहरातील सुमारे ४० पेक्षा जास्त मशिदींमध्ये देखील ईदची विशेष नमाज पठण झाली.

तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आयुक्त (Commissioner of Police) जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या ठिकाणी मंडप उभारण्यात येऊन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देण्यात आले. महापालिकेच्या वतीने मैदानावर डाकडूजीकरण करण्यात आले होते. तर दोन रकात वाजीब नमाज झाल्यानंतर अरबी भाषेत खतीब साहेब यांनी “खुत्बा’ चे वाचन केले. यानंतर विशेष दुवा करण्यात आली. तसेच दुवानंतर सर्वांनी मोठ्या आदबीने उभे राहून सलातोसलामचे वाचन केले.

नमाज नंतर कुर्बानी

नाशिक शहर परिसरातील ४० पेक्षा जास्त मशिदींमध्ये ईदची विशेष नमाज स्थानिक इमामांच्या नेतृत्वाखाली पठण करण्यात आली. काही मशिदींमध्ये भाविक जास्त आल्यामुळे दोन वेळा नमाज पठण झाली. दरम्यान ईदची विशेष नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी कुर्बानी देण्यास प्रारंभ केला. यासाठी मागील अनेक दिवसांपासून बोकडांची खरेदी करण्यात आली होती.

दर्गा शरीफ, कब्रस्तानमध्ये गर्दी

ईदची नमाज झाल्यानंतर हजारो भाविकांनी सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले बडी दर्गा शरीफ येथे तसेच इतर दर्गा शरीफ मध्ये त्याचप्रमाणे आपल्या मृत आप्तेष्टांच्या कबरीवर अर्थात कब्रस्तान मध्ये जाऊन पुष्प अर्पण करून फातेहा पठण करत विशेष दुवा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या