Friday, April 26, 2024
Homeनगरटेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार

टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरूण ठार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहर (Rahuri City) हद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar-Manmad Highway) मुळा नदीवरील पुलाच्या (Bridge over the Mula river) जवळ आयशर टेम्पोने मोटारसायकलला जोराची धडक (Eicher Tempo hits the motorcycle hard) दिली. या घटनेत तालुक्यातील दोन तरूण जागेवरच ठार (Death) झाल्याची घटना काल दि. 23 सप्टेंबर रोजी सव्वादोन वाजे दरम्यान घडली. घटनेनंतर पसार झालेल्या टेम्पो चालकाला पाठलाग करुन पकडण्यात आले.

- Advertisement -

काल दि.23 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील दोन तरूण स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एमएच 17 एन 7891 हिच्यावर बसून नगर-मनमाड रस्त्याने (Nagar-Manmad Highway) राहुरीकडून राहुरी खुर्दकडे जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने मुळा नदीवरील (Mula River) पुलाजवळ असलेल्या बगीचा जवळ मोटारसायकलला जोराची धडक दिली. या भिषण अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर झाला. तसेच मोटारसायकलवरील दोन तरूण जागेवरच ठार झाले. त्या ठिकाणी एका महिलेने मिठाईचे दुकान लावले होते.

धडक झाल्यावर मिठाई रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. तर महिला बालंबाल बचावली. अपघातानंतर आयशर टेम्पो घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, राहुरी खुर्द (Rahuri) येथील गणेश भांड व रवी आभाळे या दोन तरूणांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आयशर टेम्पोचा मोटारसायकलवर पाठलाग केला. नांदगाव (Nandgav) परिसरात त्या टेम्पोला पकडून टेम्पोचालकाला घटनास्थळी आणले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पोचालकाची उपस्थित नागरिकांनी यथेच्छ धुलाई करत राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे विलास भानुदास चव्हाण व गोरख गायकवाड असे असून ते राहुरी (Rahuri) तालुक्यातील वरवंडी (Varvandi) परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समजली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसात (Rahuri Police) उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या