Friday, April 26, 2024
Homeजळगावअनुसूचित जाती-जमातीच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

अनुसूचित जाती-जमातीच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

समाजातील शेवटच्या घटकाचा प्राधान्यक्रमाने विचार करणार असून खेड्यापाड्यातील अनुसूचित जाती(Scheduled Castes) आणि जमातीच्या (Scheduled Tribes) बांधवांच्या तक्रारी (Complaints) आणि त्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय मिळवून (Getting justice) देण्यासाठी प्रयत्न (Try) करणार आहे, असे प्रतिपादन एससी-एसटी आयोगाचे सदस्य (SC-ST Commission Member) किशोर मेढे (Kishor Medhe) यांनी केले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य किशोर मेढे यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना आयोगाच्या कार्यपद्धती संदर्भात भाष्य करून जमलेल्या एससी एसटी समाजाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 7 नोव्हेंबर हा दिवस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा दौर्‍यावर असलेले एससी-एसटी आयोगाचे सदस्य किशोर मेढे यांनी अजिंठा अतिथीगृहावर कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर,प्रा.डॉ.सत्यजित साळवे, प्रा.गौतम निकम,प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे, ग्राम विकास अधिकारी प्रशांत तायडे, प्राचार्य डॉ. वासुदेव वले,जे.पी.सपकाळे, बोदवड पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, प्राचार्य यशवंतराव मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी रविकिरण बिर्‍हाडे, वसंतराव बिर्‍हाडे, कॉस्टट्राईबचे जिल्हाध्यक्ष रविंद्र तायडे, पुलकेशी केदार, दिलीप अहिरे, अ.फ.भालेराव, खडक्याचे सरपंच विलास सपकाळे, सरपंच देविदास साळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी तर आभार बापू साळुंखे यांनी मानले.

सन 2011 ते 2017 या कालावधीमध्ये किशोर मेढे सदर आयोगाचे सचिव म्हणून काम पाहत होते. या काळात अनुसूचित जाती-जमातीच्या विविध तक्रारींचा कायदेशीर पाठपुरावा करीत त्या सोडवण्यात त्यांना यश आले. त्या पदाचा अनुभव लक्षात घेता पुढील पाच वर्षासाठी त्यांना आयोगाचे सदस्य म्हणून शासनाने नियुक्त केले आहे. नोकरदारांचे होणारे शोषण, त्यांच्यावर होणारे अन्याय तसेच बेरोजगार तरूण, महिला व समाजातील इतर घटक यांच्या तक्रारी आयोगात आल्यानंतर त्यांची रीतसर दखल घेऊन कायदेशीर पद्धतीने त्यांना प्राधान्याने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. खेड्यातील घरकुल योजना, गावठाण जमिनीचा प्रश्न, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आणि त्याच बरोबर ट्रॉसिटीच्या केसेस इत्यादी बद्दल सविस्तर चर्चा यानिमित्ताने करण्यात आली. शासकिय सेवेत काम करताना एससी- एसटीच्या कर्मचार्‍यावर होणार्‍या अन्यायाची दखल आयोगाने घेतली पाहिजे आणि सदर कर्मचार्‍याला तात्काळ न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाने पुढाकार घ्यावा, अशी विनंती प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या