संगतीचा प्रभाव

jalgaon-digital
2 Min Read

माणूस कोणत्या प्रकारच्या संगतीत रहातो, त्या संगतीचा त्याच्यावर बराच परिणाम होतो. जीवनात बर्याचदा अशा घटना घडतात, ज्यात आपण पाहतो कि एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या वातावरणात जगत असतात, तेव्हा त्यांची वर्तणूक, बोलण्याची पद्धत, विचार भिन्न होऊ लागतात.

महापुरुष आपणाला समजवतात की आपण चांगल्या संगतीत राहिले पाहिजे. मैत्री अश्या लोकांची करावी ज्यांची विचारसरणी शुद्ध आहे. महापुरुष वारंवार चांगल्या संगतीत राहण्यास सांगतात. अशा लोकांबरोबर राहा, अशा लोकांबरोबर वेळ घालवा, ज्याचे लक्ष परमेश्वराकडे आहे. जेव्हा आपण त्यांच्या सहवासात राहू, तेव्हा आपले विचारही त्याच प्रकारचे होतील आणि आपले लक्षही परमेश्वराकडे आकर्षित होईल. ज्यांचे लक्ष केवळ संसारात आहे अशा लोकांशी जर आपण संगती केली तर आपलेही लक्ष विचलित होऊन देवापासून दूर जाऊ लागेल. तर आपण कोणत्या संगतीत राहायचे, कोणाशी मैत्री करायची, कोणत्या वातावरणात जगावे, हे आपल्यावर अवलंबून आहे.

बर्‍याच वेळा एखादी व्यक्ती असा विचार करते कि मी सभोवतालचे वातावरण बदलू शकत नाही. परंतु महापुरुष आपल्याला स्पष्ट करतात की आपल्याशी जोडली गेलेली पूर्व कर्मे आपण बदलू शकत नाही, परंतु आपले पंचवीस टक्के जीवन कसे जगायचे ते आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण योग्य व चांगल्या दिशेने पाऊल टाकले तर आपण प्रभूशी जवळीक साधू शकू आणि जर आपण योग्य आणि चांगल्या दिशेने पाऊले टाकली नाहीत तर आपले जीवन जास्त बिघडेल. म्हणूनच आपल्याला समजवण्यात येते कि आपण चांगली संगत ठेवावी.

जेव्हा आपण महापुरुषांचे जीवन पाहतो, त्यांच्या सानिध्यातील वातावरणामुळे आपले ध्यान नेहमी परमेश्वराकडे वळते. कारण त्यांना वाटते कि आपण प्रभूस जाणून घ्यावे आणि प्रभूला प्राप्त करावे. आपल्या आत्म्याचे मिलन परमात्म्याशी व्हावे. आपण जितके जास्त लक्ष प्रभू कडे देऊ तितकेच आपण त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकू. ज्याच्याकडे आपले लक्ष जाईल, त्याचप्रमाणे आपण होऊ. चांगल्या संगतीने आपले ध्यान प्रभू कडे सहज जाते. यासाठी चांगली संगत असणे फारच गरजेचे आहे.

(अध्यात्मिक गुरू संत राजिंदर सिंह जी महाराज हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्माचे विज्ञान) तथा सावन कृपाल रूहानी मिशन या आंतरराष्ट्रीय अध्यात्म संस्थेचे प्रमुख आहेत.)

Share This Article