Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षणाचा झाला फार्स, नेटवर्क नाही, खेळ खलास

शिक्षणाचा झाला फार्स, नेटवर्क नाही, खेळ खलास

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

शिक्षणाचा (Education) झाला फार्स, नेटवर्क नाही खेळ खलास, अशी स्थिती सध्या पाचवी ते आठवी ऑनलाईन शिक्षण (Online Teacher) पध्दतीमुळे झाली आहे. यामुळे राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

करोना महामारीच्या (Covid 19 Pandemic) पार्श्वभूमीवर गेल्या वर्षापासून शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याची परवानगी (Permission to start classes five to eight) शिक्षण विभागाने दिली. यानंतर जेमतेम दोन महिने देखील शाळा सुरु राहिल्या नाही. तोच करोनाची दुसरी महाभयंकर लाट आली. त्यामुळे शाळा बंद कराव्या लागल्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून मागील वर्षाच्या गुणवत्तेनुसार सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. यानंतर मात्र, शिक्षण विभागाने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला.

त्याप्रमाणे संबंधीत विद्यालयाने संकेतस्थळ तयार केले व झूम अ‍ॅपद्वारे मोबाईल मधून ऑनलाईन शिक्षण वर्ग सुरु केले. याचा लाभ आपल्या मुलांना मिळावा यासाठी ठराविक पालकांनी आपल्या मुलांना अ‍ॅण्ड्रॉईड महागडे मोबाईल (Android expensive mobile) घेऊन दिले. मोबाईल हातात आल्यानंतर मुलांना देखील अप्रूप वाटले. त्यांना खूप आनंद झाला. आता आपल्याला मोबाईल वरुन अभ्यास करता येईल, म्हणून मुलं सुखावली. परंतू झाले मात्र उलटेच! शहरी भाग सोडला तर वाड्यावस्त्यावर मोबाईल नेटवर्क (Mobile Network) व्यवस्थित मिळत नसल्याने शेकडो विद्यार्थी यापासून वंचित राहिले. अभ्यासक्रमाऐवजी मुले मोबाईलवर गेमच जास्त खेळू लागले. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली. परंतु बिचारे शिक्षक काय करणार?

मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे, यासाठी आमचा देखील आटापिटा सुरु आहे. आम्ही रोज ऑनलाईन वेगवेगळ्या विषयांच्या तासिका घेत आहोत. मुलांचा अभ्यास घेत आहोत. पण अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्याने मुलांना यापासून वंचित रहावे लागत आहे. याला आमचाही नाईलाज आहे. शिक्षकांचे उत्तर ऐकून पालक हाताश झाले आहेत. शिक्षणाचा हा तिढा सोडवायचा कसा? हा आता सर्वांसमोर मोठा प्रश्न निर्माण होऊन बसला आहे. जोपर्यंत मुलं वर्गात बसून शिक्षण घेऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांची शैक्षणिक प्रगती होणे अवघड आहे. आणि यासाठी करोना समूळ नष्ट होणे गरजेचे आहे. नाहीतर शिक्षणाच्या आयचा घो, असे म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांवर आली आहे.

शासनाने ऑनलाईन शिक्षण सुरु केल्यामुळे काही ठराविक पालकांनी आपल्या मुलांना स्मार्टफोन घेऊन दिले. पण ही संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. अनेक पालकांची स्मार्ट फोन घेण्याची ऐपत नाही. काही कुटुंबांत तीन ते चार मुलं व काही कुटुंबात यापेक्षाही जास्त मुलं शालेय शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात एकत्रित कुटुंबपध्दती असल्याने अशांची संख्या जास्त आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, त्यांना वाड्यावस्त्यावर नेटवर्क नाही. फक्त गावातील मुलांनाच नेटवर्क मिळत असल्याने ठराविक मुलांनाच याचा फायदा होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत अनेक पालकांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या