Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सह्याद्री’वर शैक्षणिक कार्यक्रम

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सह्याद्री’वर शैक्षणिक कार्यक्रम

मुंबई –

इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा डीडी सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन

- Advertisement -

करण्यात आले आहे. त्यानुसार विषयनिहाय तासिकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात ट्विट करून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. या तासिका 15 मार्चपासून सुरू होणार आहेत.

इयत्ता दहावीसाठी सोमवार – 12:30 ते 1:00, मंगळवार ते शुक्रवार – 12:30 ते 1:00 आणि 1:30 ते 2:0 तसेच बारावीसाठी सोमवार ते शुक्रवार – 2:30 ते 3:30 अशी वेळ निश्‍चित करण्यात आली आहे.

इयत्ता निहाय व विषय निहाय दैनंदिन वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे अशी माहिती शिक्षण मंत्री गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही याबाबतचे वेळापत्रक उपलब्ध आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या