Thursday, April 25, 2024
Homeनगरशैक्षणिक संस्थेचे खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक

शैक्षणिक संस्थेचे खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

अलाईन्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेची व धर्मदाय आयुक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी

- Advertisement -

येथील काँग्रेसच्या नगरसेविका शबाना रईस बेपारी यांच्यासह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, करीम इस्माईल तांबोळी (रा. वडगावपान) यांनी अलाईन्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. या संस्थेच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून नोंदणी केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष म्हणून करीम तांबोळी यांनी काम केले. संगमनेरात एका ठिकाणी जागा भाड्याने घेऊन त्यात पहिलीपासून इंग्लिश स्कूल सुरू केले. 2007 साली संस्थेच्या विश्वस्त मंडळातील तिघांनी राजीनामे दिले.

यानंतर विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर करण्यात आला होता. नवीन विश्वस्त मंडळात उपाध्यक्षपदी नजीर तांबोळी, सचिवपदी वसीम तांबोळी, महंमद खान, मुशरफ खैरादी यांना विश्वस्त करण्यात आले. तर हंगामी अध्यक्ष म्हणून करीम तांबोळी यांनी पदभार स्विकारला होता.

दरम्यान संस्थेचे अध्यक्ष करीम तांबोळी यांचे निधन झाले. संस्थेचे ज्या ठिकाणी खाते होते त्या बँकेच्या पत्रावरुन कोणीतरी खात्यावरील सह्या बदलवण्यासाठी अर्ज केला. तो अर्ज तपासला असता त्यावर संस्थेचे अध्यक्ष म्हणून रईस अहमद शेख यांचे नाव होते. त्यांनी बनावट कागदपत्रे, सही शिक्के बनवून विश्वस्त मंडळ तयार केले होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे पदे नेमण्यास त्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला होता.

या प्रकारामुळे नजीर तांबोळी यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयात चौकशी झाल्यानंतर नगरसेविका शबाना बेपारी, रईस शेख, जावेद शेख, महंमद जावेद जावेद हुसेन (रा.अलकानगर) असा चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले, त्यानुसार नजीर इस्माईल तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द भारतीय दंड संहिता 420, 416, 465, 467, 468, 471, 472 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या