Friday, April 26, 2024
Homeनगरशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांची निदर्शने

शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांची निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा वेतन, भविष्य निर्वाह निधी व दप्तर दिरंगाई प्रश्नासंदर्भात अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

- Advertisement -

या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, एम.एस. लगड, महेंद्र हिंगे, बद्रीनाथ शिंदे, एच.ए. नलगे, रमजान हवालदार, देविदास खेडकर, रमाकांत दरेकर, शिरीष टेकाडे, संभाजी गाडे, बाळासाहेब निवडुंगे, गीताराम वाघ, नवनाथ घुले, राजेंद्र खेडकर, प्रसाद बारगजे, प्रसाद साठे, जनार्धन पठारे, सुभाष पानसंबळ, दिलीप बोठे, आसिफ पठाण, भागचंद कोकाटे, सुनील कोठुळे, एन.आर. शितोळे आदी सहभागी झाले होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करून माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्या आदेशान्वये सदर आंदोलन करण्यात आले. गणेशोत्सव, मोहरम सणानिमित्त ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचे वेतन विशेष बाब म्हणून 25 ऑगस्ट पूर्वी अदा करण्यात यावे, त्यापुढील प्रत्येक महिन्यांचे वेतन एक तारखेला अदा करावे तसेच सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचार्‍यांचे भविष्य निर्वाह निधीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात यावी, दप्तर दिरंगाई व वेतन पथक कार्यालयात सुरू असलेली अनागोंदी त्वरीत थांबविण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीचे निवेदन माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन अधीक्षक स्वाती हवेले यांना देण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर यांच्या जिव्हाळ्याच्या सदर प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या