Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यातपमान वाढते आहे; शिक्षण आयुक्तांकडून शाळांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना

तपमान वाढते आहे; शिक्षण आयुक्तांकडून शाळांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना

पुणे | प्रतिनिधी Pune

राज्यात उष्णतेची लाट आली आहे. ठिकठिकाणी तपमानाने चाळीशी ओलांडली आहे. दुसरीकडे शाळा सुरु असल्यामुळे मुलांना या उष्णतेचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education commissioner Suraj Mandhare) यांनी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना हवामान खात्याच्या संपर्कात राहून योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत…

- Advertisement -

शिक्षण आयुक्त मांढरे (Education commissioner Suraj Mandhare) यांनी पाठवलेल्या एका संदेशात उष्णता (heat) वाढल्यामुळे मुलांची चिंता वाढलेली आहे. हवामान खात्याकडून (IMD) वेळोवेळी देण्यात येणाऱ्या तपमानाबाबतच्या माहितीनंतर तपमान (Temperature) वाढल्यास शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी (Collector) किंवा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) यांच्याशी या विषयावर चर्चा करावी. यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. हे स्पष्ट करण्यात येत आहे की IMD द्वारे जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेच्या चेतावणीच्या प्रसंगी, संबंधित शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी/सीईओ यांच्याशी चर्चा करून जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा.

सूरज मांढरे भाप्रसे, आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या