Thursday, April 25, 2024
Homeजळगावभेसळीच्या संशयावरून चाळीसगावात खाद्यतेलाचे घेतले नमुने

भेसळीच्या संशयावरून चाळीसगावात खाद्यतेलाचे घेतले नमुने

चाळीसगाव – Chalisgaon – प्रतिनिधी :

शहरासह तालुक्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तेलात भेसळीचा प्रकार करून ग्राहकांना लुटले जाते.

- Advertisement -

या अनुषंगाने अन्न आणि औषध प्रशासन जळगाव यांच्या पथकाने शुक्रवारी चाळीसगाव येथील स्टेशन रोडवरील मे राजकुमार माणिकचंद अग्रवाल या दुकानावर छापा टाकून भेसळीच्या संशयावरून सुमारे 3 लाख 93 हजार 310 रूपये किंमतीचे संशियत भेसळयुक्त खाद्यतेलाच्या साठ्याचे नमुने घेतले.

शहरात पहिल्यांदाच अन्न व प्रशासनाच्या पथकाने सुमारे 15 लिटरचे 19 कॅन्स व प्रत्येकी 180 किलोचे 16 बॅरेल असे रिफाईन्ड सोयाबीन तेल जप्त केले.

दरम्यान पथकाने शहराती काही मिठाईची नमुने व दुध विक्री करणार्‍या दुकानांवर जावून मिठाई जप्त केल्याचे समजते., तसेच खाद्यतेलाचे नमुने घेतले असून ते परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात खाद्यतेल, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी पदार्थावर नजर ठेवणेकामी भेसयुक्त पदार्थाविरोधात मोहिम सुरु करण्यात आली आहे.

या मोहीमेचा भाग म्हणून दि.6 रोजी दुपारी 1 ते 4 वाजेच्या दरम्यान शहरातील स्टेशन रोडवरील मे राजकुमार माणकचंद अग्रवाल या खाद्यतेलाच्या दुकानावर अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, नमुना सहाय्यक चंद्रकांत सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकून विक्री करीता, पॅक केलेले रिफाईंड सोयाबीन तेलाचा नमुना घेऊन 15 लिटरचे 49 कॅन्स व 16 बॅरल प्रत्येकी 180 किलो असा एकूण 3 लाख 93 हजार 310 रूपये एवढ्या किंमतीचा तेलाचा साठा भेसळयुक्त असल्याचा संशय आहे.

दिवाळी सणाच्या अनुषंगाने नागरीकांच्या आरोग्याच्या हिताचे दृष्टीने यापुढेही तपासणी मोहीम राबवून कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या