Friday, April 26, 2024
Homeनगरआर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक कदम गजाआड

आर्थिक गुन्हे शाखेकडून संचालक कदम गजाआड

अहमदनगर|Ahmedagar

मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांचे पैसे परत न दिल्यामुळे रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. संतोषकुमार संभाजीराव कदम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी, प्रकाश नथ्थू सोनवणे, लक्ष्मण सखाराम जाधव व सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख यांना अटक केली आहे. ते सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत. सरव्यवस्थापक बडाख याने गुन्ह्यातील महत्वपूर्वी कागदपत्रे पोलिसांना दिली आहेत.

तोफखाना पोलीस ठाण्यात 7 ऑगस्टला 2021 रोजी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, प्राधिकृत अधिकारी, नगर तालुका उपनिबंधक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ठेविदार इस्माईल गुलाब शेख यांनी फिर्याद दिलेली आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या