Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशपेट्रोल पंपावरील मोदींचा फोटो असलेले बॅनर हटवा

पेट्रोल पंपावरील मोदींचा फोटो असलेले बॅनर हटवा

दिल्ली l Delhi

पेट्रोल पंपांवर केंद्र सरकारच्या योजनांच्या जाहिरातींचे बॅनर लावलेले आहेत. या बॅनरवर..

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा असे निर्देश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांना दिले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथे विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोगाने या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू झाली. यावरूनच पंतप्रधान मोदींचे फोटो असलेल्या सरकारी योजनांच्या जाहिरातींच्या बॅनरमुळे आचारसंहितेचं उल्लंघन होत आहे. यामुळे ही बॅनर ७२ तासांच्या आत हटवा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

तृणमूल काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून हा आदेश देण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसने करोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप नोंदवला होता. निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांसोबतच करोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही ७२ तासांत हटवण्यास सांगितलं आहे.

तसेच भाजपने तृणमूल काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी आचारसहिंता जाहीर झाल्यानंतर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. हे आरोप तृणमूल काँग्रेस फेटाळले. या प्रकरणात निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे भाजपने सांगितले. संबंधित मंत्र्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावे अशी मागणी करणार असल्याचे भाजपने सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदार संघ आहेत. सर्वाधिक जास्त जागा पश्चिम बंगालमध्ये असल्याने भाजपनेही येथे सत्ता परिवर्तनासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी मोर्चेबांधणीवर भर दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या