Friday, April 26, 2024
Homeराजकीयखा. शरद पवारांची दोंडाईचातील सभा रद्द

खा. शरद पवारांची दोंडाईचातील सभा रद्द

दोंडाईचा । श.प्र. Dondaicha

शिंदखेडा मतदार संघातील दहशत व भयमुक्त अभियानाच्या समारोपनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची 17 रोजी होणारी जाहीर सभा पुढे ढकलण्यात आली आहे. प्रदेश उपाक्षध्य माजी आ. अनिल गोटे यांनी याबाबतची माहिती दै. देशदूतशी बोलतांना दिली.

- Advertisement -

श्री. गोटे यांनी शिंदखेडा मतदार संघ दहशत मुक्त अभियान 26 जानेवारीपासून सुरु केले असून उद्या 17 रोजी या अभियानाचा समारोप होतो आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित राहणार असल्याचा गाजावाजा करणार्‍यात आला, जय्यत तयारीही झाली मात्र ऐनवेळी दौरा रद्द झाला आहे.

आपण या सभेला उपस्थित राहण्याची सहमती दर्शविली होती. मात्र आजच मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांसमवेश घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून कोरोना प्रसार रोखण्याचे आवाहन केले आहे. राजकीय पक्षांकडूनही सहकार्याची अपेक्षा केली आहे.

त्यामुळे उपस्थितीत राहण्याची मनापासून इच्छा असूनही नाईलाजाने हजर राहू शकत नाही याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. कोरोनाचे सावट दूर होवून शासनाचे सुधारीत आदेश आल्यावर आपण निश्चित उपस्थित राहू तोपर्यंत कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा, अशा अशायाचा मेल खा. पवार यांनी आपल्याला पाठविला असल्याचे श्री. गोटे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या