Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानात भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत

पाकिस्तानात भूकंपाचे धक्के; नागरिक भयभीत

नवी दिल्ली | New Delhi

पाकिस्तानमधील (Pakistan) इस्लामाबाद येथे आज (दि.२९) रोजी दुपारी १ वाजून २४ वाजता भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल इतकी असल्याचे बोलले जात आहे…

- Advertisement -

याबाबत नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची पुष्टी केली आहे. या भूकंपामुळे  परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच हे धक्के इस्लामाबादसह (Islamabad) आसपासच्या शहरातही जाणवल्याने नागरिक भयभीत झाले होत.

तसेच गेल्या वर्षीच्या जून महिन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले होते. त्यानंतर आज पाकिस्तानात भूकंप झाल्याने त्याची गंभीरता वाढली आहे.

दरम्यान, पाकिस्तानात याधीही भूकंपाच्या धक्क्यांनी आपत्ती निर्माण केल्याच्या घटना घडल्या आहेत. इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी, मुल्तान या भागाबरोबरच फैसलाबाद, एबटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडीमध्ये भूकंपाच्या आपत्तीला तोंड द्यावे लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या