Thursday, April 25, 2024
Homeनाशिककान-नाक व घसा तज्ञ जिल्हा रुग्णालयात देणार सेवा

कान-नाक व घसा तज्ञ जिल्हा रुग्णालयात देणार सेवा

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कान, नाक व घसा तज्ज्ञ असलेले सहा डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात सेवा देणे सुरू केले आहे. तसेच शहरातील सर्वच बालरोग तज्ञांनी जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

- Advertisement -

म्युकरमायकोसिस या पोस्ट कोव्हिड आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरातील कान-नाक-घसा तज्ज्ञांना मदतीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत शहरातील 6 डॉक्टरांनी लागलीच प्रशासनाची मदत करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मनुष्यबळ व आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध होईपर्यंत रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून खासगी कान, नाक व घसा तज्ञ डॉक्टर्स यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत म्युकरमायकोसिस रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सहा डॉक्टर्सने सहमती दर्शवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या