Friday, April 26, 2024
Homeजळगावरास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशिन तहसिल कार्यालयात केले जमा

रास्तभाव दुकानदारांनी ई-पॉस मशिन तहसिल कार्यालयात केले जमा

पारोळा – parola

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच संपूर्ण देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली (Public distribution system) अंतर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणाऱ्या अन्नधान्यासाठी सर्व रास्तभाव दुकानांना (Fair price shop) देण्यात आलेले ई-पॉस मशिनला (E-pos machine) नियमीत पणे तात्रिक अडचणी येत असतात.

- Advertisement -

सदर बाबतीत तालुका स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर नेहमीच तक्रारी होत असतात. त्यामुळे रास्तभाव दुकानदार लाभार्थ्यांच्या नेहमीच वाद होत असतात. तसेच लाभार्थी हे दुकानदारांना शिवीगाळ करतात त्यामुळे रास्तभाव दुकानदारांची मानसिक स्थिती खराब होत असते. सदरची बाब ही नियमीत पणे निदर्शनास आणून देण्यात येत असते तरी देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच सदरचे ई-पॉस मशिन हे टूजी असुन सद्या फाइव्ह जीचा जमाना आहे. त्यामुळे सदरचे मशिन हे जुन्या व्हर्जनचे असल्यामुळे नियमीत नादुरुस्त होत असते व नेहमीच सर्व्हर प्राब्लेम वगैरे अडचणी येत असतात. तसेच बॅटरी बॅकअप देखील देत नाहीत. तरी सदरच्या नियमीत येणाऱ्या अडचणी वरिष्ठांच्या लक्षात आणून देवून देखील आज पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.

तरी सदरचे ई-पॉस मशिन हे चांगल्या कंपनीचे व चांगल्या दर्ज्याचे मिळावेत. रास्तभाव दुकानदारांच्या संघटनेद्वारे सदरचे ई-पॉस मशिन प्रशासनाच्या ताब्यात देवून सदरच्या बाबतीत पारोळा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना निषेद व्यक्त करीत आहे. त्यानुसार पारोळा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटना ही ई-पॉस मशिन प्रशासनाच्या ताब्यात देत असुन त्याबाबत आपणांस निवेदन सादर करीत आहोत. तसेच याबाबत कुठलीही कार्यवाही होत नाही तोपर्यंत लाभार्थी हे अन्नधान्यापासून वंचीत राहू नये म्हणून आम्हास ऑफलाईन पध्दतीने अन्नधान्य वितरणास परवानगी मिळावी असे निवेदन तहसीलदार अनिल गवांदे (Tehsildar Anil Gawande) यांना दिले,

निवेदनावर तालुका अध्यक्ष दिनकर पाटील तालुका उपाध्यक्ष राजू पाटील तालुका शहर अध्यक्ष भिकन महाजन तालुका सचिव मनोहर वाणी, प्रदीप राजपूत, दिलीप सोनकुडे, के के पाटील, पिरण पाटील यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या