Thursday, April 25, 2024
Homeनगरई पीक पाहणी अ‍ॅपच्या अडचणीमुळे शेतकरी त्रस्त

ई पीक पाहणी अ‍ॅपच्या अडचणीमुळे शेतकरी त्रस्त

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

राज्य सरकारने पीक विमा घेण्यासाठी ई-पीक पाहणी अंतर्गत नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र या अ‍ॅपला अनेक अडचणी येत असून त्यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. 15 ऑक्टोबरची असलेली नोंदणीची मुदत आता संपून गेली आहे. अनेक शेतकर्‍यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही.

- Advertisement -

पाचेगाव व पुनतगाव या दोन्ही गावांत जवळपास 2367 खातेदार आहेत.इतके खातेदार असताना केवळ 250 खातेदारांची पीक पाहणी नोंदणी केली. त्यात पाचेगावमध्ये 2107 हेक्टर तर पुनतगावमध्ये 999 हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामातील सर्वच शेतकर्‍यांची ई पीक पाहणी नोंदणी होत नाही तोपर्यंत मुदत वाढ द्यावी, अशी मागणी पाचेगावचे उपसरपंच श्रीकांत पवार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या