Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात ड्युरो सिलेंडर कार्यान्वित

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात ड्युरो सिलेंडर कार्यान्वित

चाळीसगाव – chalsigaon – प्रतिनिधी :

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये मेडिकल ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर जिल्ह्यातून दाखल होऊन ते नुकतेच कार्यान्वित झाले आहे.

ड्युरो सिलेंडर बसविण्यासाठी डॉक्टरांचा फोन आल्यानतंर डोळ्यापुढे फक्त रुग्णाचे प्राण वाचविण्याचा विचार होता. त्यामुळे रात्री १२ ते ३ वाजेच्या अर्थक प्रयत्नांनी आम्ही २० ते २५ जणांनी मिळुन सिलेंडर तातडीने बसविले. मी स्वता;ने कोरोनावर गेल्या पाच दिवसांपूर्वीच मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुळे होणारा त्रास अनुभवतो आहे, अगात प्रचंड थकवा आहे, परंतू कुठल्याही परिस्थिती रुग्णाचा जीव वाचवा याच भावनेतून माझा हातून हे समाजीक कार्य घडले आणि यापुढे देखील घडत राहिल.

- Advertisement -

निलेश गायकवाड, करोनायोध्दा

हे सिलेंड र आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला मिळाले असून ते तातडीने बसविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वीच वैद्यकिय आधिकारी डॉ.मंदार करंबेळकर व सत्यम ग्र्रृपने रात्रभर मेहनत घेतली.

विशेष म्हणजे सत्यम ग्रृपचे निलेश गायकवाड यांनी करोना मात केल्यानतंर हे सिलेंडर स्वयंपूर्तीने बसविण्यासाठी २० ते २५ तरुणांची मदत मिळवून देत, रुग्णालयाप्रती व करोनाग्रस्त रुग्णांसाठी समाजीक बांधलकी जोपासली आहे.

चाळीसगाव कोव्हिड सेंटर मध्ये ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता पाहून आमदार मंगेश चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाने व सिव्हिल सर्जन डॉ. ऐन. एस. चव्हाण यांच्या सौजन्याने दोन ऑक्सिजन गॅस ड्युरा सिलेंडर चाळीसगाव येथील ट्रामा सेन्टरला पाठविण्यात आले.

ड्युरा सिलेंडर चाळीसगाव येथे पोहचल्यानतंर डॉ. मंदार करंबेळकर यांनी तातडीने रात्री १२ वाजता निलेश गायकवाड यांच्या सत्यम ग्रुपच्या मदतीने सिलेंडरकायमची सुविधा झाली आहे.

इच्छीत जागेवर हलवले

सिलेंडर बसवण्यासाठी पाईपलाईन मधील बदल सुनील साळुंखे यांनी रात्री १२ ते ३ यावेळेत काम पूर्ण केले ,आणि चाळीसगाव तालुक्याच्याच नाही तर आजू बाजूच्या तालुक्यांनासुद्धा उपयोगी पडणार्‍या कोव्हिड सेंटरला ड्युरा सिलेंडर कार्यान्वित झाले.

त्यामुळे सिलेंडर भरण्यासाठी जाणारा वेळ आणि शक्ती वाचली आहे. शिवाय रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था झाली. सिलेडरसाठी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

चाळीसगाव ग्रामीण रुग्णालायात दोन ड्युरो सिलेंडर कार्यन्वीत झाल्यानतंतर कोवीडच्या रुग्णाना जगण्यासाठी मोकळा श्‍वास घेतण्याची

- Advertisment -

ताज्या बातम्या