Thursday, April 25, 2024
Homeनगरसाखळी बंधार्‍यांमुळे जलसमृद्धी - सौ. दुर्गाताई तांबे

साखळी बंधार्‍यांमुळे जलसमृद्धी – सौ. दुर्गाताई तांबे

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केलेल्या सलगच्या साखळी बंधार्‍यांमुळे संगमनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये जलसमृद्धी निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांनी काढले आहेत.

- Advertisement -

देवकौठे येथे देवनदीवरील बंधार्‍याचे जलपूजन नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्रीराम मुंगसे होते. समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवत आरोटे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष इंजि. सुभाषराव सांगळे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, अनिल गाजरे, लक्ष्मण सांगळे, एकनाथ मुंगसे, जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ, दत्तू मुंगसे, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, अंबा मुंगसे, यशोदा सांगळे, लक्ष्मण सांगळे, काशिनाथ कहांडळ, प्रा. राजाराम मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे उपस्थित होते. यावेळी श्रीराम मुंगसे व बिजला मुंगसे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सौ. तांबे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने देवकौठे गावासह तळेगाव भागावर प्रेम केले आहे. साखळी बंधार्‍यांमुळे या भागामध्ये मोठी जलसमृद्धी झाली आहे. दुष्काळी असलेल्या या गावाने कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसायातून मोठी क्रांती केली आहे.

याप्रसंगी महामंडलेश्वर काशीकानंद महाराज, भागवत आरोटे, सुभाष सांगळे, श्रीराम मुंगसे, प्रा. राजाराम मुंगसे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, अनिल गाजरे, यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. राजाराम मुंगसे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर ज्ञानेश्वर मुंगसे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या