दंडकारण्य अभियानांतर्गत वृक्ष लागवडीसाठी सर्वांनी बिया जमा कराव्या – सौ. तांबे

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर सर्वात प्रभावी उपाय असलेल्या वृक्षरोपण व संवर्धनासाठी सुरू असलेल्या दंडकारण्य अभियानाच्या 17 व्या वर्षात वृक्षरोपणासाठी तालुक्यातील सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या, फळझाडांच्या बिया जमा कराव्यात, असे आवाहन दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुखव संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

याबाबत दुर्गाताई तांबे म्हणाल्या, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी हरितसृष्टीच्या निर्मितीसाठी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियानाचे हे सतरावे वर्ष आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व सहकारी संस्था, सर्व विद्यालय, सर्व सेवाभावी संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून मागील सोळा वर्षात तालुक्यातील उघड्या बोडक्या डोंगरांवर वृक्षांचे व बियांचे रोपन झाले आहे. त्यामुळे अनेक उघडी बोडके डोंगर हिरवीगार दिसू लागली आहेत तसेच तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे.

ग्लोबल वार्मिंग च्या समस्येतून पडणारे दुष्काळ, दूषित हवामान, करोना सारखे संकट या सर्वांवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून यावर्षी तालुक्यातील सर्व नागरिक महिला भगिनींनी आपल्या घराच्या आसपास असलेले लिंब, जांभूळ, आंब्याच्या कोया, सीताफळ, करवंद यांचेसह विविध फळे, फुलझाडे या सर्व बिया जमा कराव्यात.

तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी हे आपल्या तालुक्यातील वृक्षदूत आहेत. म्हणून सर्व शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी यांना आवाहन आहे की विद्यार्थ्यांनी सर्व गोळा केलेल्या बिया ह्या आपल्या शाळेत जमा करून घ्याव्यात. आपल्या शाळेत एक सीड बँक तयार करावी.

आपण जमा केलेल्या बिया या विविध डोंगर, मोकळ्या जागा यामध्ये रोपण केल्या जाणार आहेत. तरी या सर्व संकलित झालेल्या बिया यशोधन कार्यालय जवळील शेतकी संघाच्या स्टॉलवर जमा कराव्यात, यासाठी श्री. घुले व समन्वयक बाळासाहेब उंबरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *