Thursday, April 25, 2024
Homeनाशिककेबल टाकण्यासाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली 

केबल टाकण्यासाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली 

उजणी । राम सुरसे

वाळू वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाट लागलेल्या पंचाळे – दहिवाडी या सिन्नर तालुक्यातील रस्त्याची साईडपट्टी ओएफसी केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ठेकेदाराने रात्रीच्या अंधारात केलेल्या या कामामुळे परिसरातील रहिवासी शेतकरी संतप्त झाले असून संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

- Advertisement -

सिन्नरच्या पूर्व भागातील दळणवळणासाठी महत्वाच्या असलेल्या पंचाळे- उजणी, दहिवाडी रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. त्यातच वाळु वाहतुकीमुळे रस्त्याचे होणारे नुकसान यामुळे पंचाळे ते दहिवाडी दरम्यान नियमित ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर महिला यांना जीव मुठीत घरून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यालगतचे रहिवाशी आणि शेतकऱ्यांनी याबाबत तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाप्रती संतापाची भावना असतानाच आता ओएफसी केबलसाठी भरस्त्यातच खोदकाम सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने मध्यरात्रीपासून काम सूरु करताना श्रीरामपुर (शिंदेवाडी)फाटा ते पंचाळे दरम्यान सुमारे दोन किमी अंतरापर्यंत साईडपट्टी खोदण्याचा पराक्रम केला आहे.

शासनाच्या महानेट या उपक्रमांअंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी देण्यासाठी ओएफची केबल टाकण्यात येत असली तरी त्यासाठी शासनाने रस्ते फोडायची परवानगी दिली आहे काय संतप्त सवाल या परिसरातील शेतकरी व रहिवासांचा आहे. ठेकेदाराने दिवसा खोदकाम करण्याऐवजी रात्रीच्या वेळेत जेसीबी चालवून रस्त्याची वाट लावली असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ठेकेदारावर कारवाई करावी आणि साईडपट्टीने नव्याने बनवून घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

‌केबलसाठी खोदकाम करताना ठेकेदाराने रस्त्यालगतच्या नळीत खोदकाम करणे अपेक्षित होते. मात्र जाणीवपूर्वक रात्रीच्या वेळी साईडपट्टी खोदून रस्त्याचे नुकसान करण्यात आले आहे. यासंदर्भात सदर कामाचा नाली खोद काम करणारे जेसीबी मालक सुरज शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता .आमच्याकडे जिल्हाधिकऱ्यांचे पत्र असून ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संबंधित विभागांना देण्यात आल्याचे त्यांचे म्हणने आहे.

सदर रस्त्याच्या कामाबद्दल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर चौकशी करतो असे सांगण्यात आले..

सदर केबल टाकतांनी रस्ता व साईडपट्टीस धक्का न लावता सदर काम करावयास हवे. सदर ठेकेदाराने मनमानी पणे ग्रामीण रस्त्यांची चाळण करणेचे काम चालु केले आहे. सदर ठेकेदाराने रस्ता पुर्ववत करूण द्यावा अन्यथा ठेकेदार यांचेवर कायदेशीर कार्यवाही करनेत येईल.

‌बाबासाहेब कांदळकर , सदस्य पं.स. सिन्नर

- Advertisment -

ताज्या बातम्या