Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रCET चे नवीन वेळापत्रक जाहीर, या तारखेला निकाल

CET चे नवीन वेळापत्रक जाहीर, या तारखेला निकाल

मुंबई :

राज्यात काही जिल्ह्यात गेली दोन दिवस अतिवृष्टीमुळे (heavy rain)मोठ्या प्रमाणत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश (cet exam)परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना (student) परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत(uday samant) यांनी दिली. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे उद्या नवी जाहीर सूचना काढली जाईल. हॉल तिकीट , सेंटर पहिल्या परीक्षेचे वापरता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंच्या निर्देशानुसार 9 आणि 10 तारखेला सीईटी घेतली जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

- Advertisement -

राज्यात सतत दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येथील.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

20 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार

या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष 2021-22 नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या