Friday, April 26, 2024
Homeनगरपोलीस उपअधीक्षक सातव यांच्यावर चाकू हल्ला करणारा जेरबंद

पोलीस उपअधीक्षक सातव यांच्यावर चाकू हल्ला करणारा जेरबंद

कर्जत |वार्ताहर|Karjat

भररस्त्यावर पोलीस उपअधीक्षक संजय सातव व पोलीस कर्मचारी बळीराम काकडे यांच्यावर चाकू हल्ला करून जखमी करणारा गुन्हेगार

- Advertisement -

उपअधीक्षक सातव व पोलीस कर्मचार्‍यांनी जिवाची पर्वा न करता जेरबंद केला. हा प्रकार एखाद्या चित्रपटांमध्ये घडणार्‍या दृष्य सारखा होता. मात्र, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दाखवलेले धाडस हे याठिकाणी वाखाणण्याजोगे होते.

कर्जत शहरातील मेन रोडवर असणारी जिल्हा सहकारी बँकेची शाखा या परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचा विलास अबलूक्या काळे अनेक महिन्यांपासून बँक कर्मचारी व बँकेत येणार्‍या नागरिकांवर दहशत पसरवत होता.

तो हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन बँकेत प्रवेश करून येथील असणार्‍या अधिकार्‍यांना मला तिजोरीची चावी द्या, अन्यथा मी तुमचा खून करेन, असे धमकावत एकदा बँक अधिकारी भोसले हे बँक उघडून आत येताच तो त्यांच्या पाठीमागे बँकेमध्ये शिरला व तिजोरीची चावी द्या, अन्यथा तुम्हाला जीव मारेल, असे म्हणत असताना त्यांनी अक्षरश या बँकेच्या काउंटरवरून उडी मारून ते बँकेच्या बाहेर पळून गेले आणि इतर कर्मचारी आल्यानंतर ते बँकेमध्ये आले होते, असे प्रकार सातत्याने सुरू होते.

शुक्रवारी सकाळपासून काळे यांने मेन रोड व बँक परिसरात दहशत निर्माण केली. हातामध्ये शस्त्र घेऊन तो बँकेमध्ये शिरला बँकेच्या काऊंटरवर त्याने शास्त्राने वारी केला आणि तू तिजोरीची चावी मागत होता. हा प्रकार सुमारे एक तासभर सुरू होता. यामुळे बँकेचे कर्मचारी व नागरिकांना वेठीस धरले होते.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सातव यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. यावेळी सातव जामखेडकडून कर्जतकडे येत होते. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल बळीराम काकडे यास काही कर्मचार्‍यांसोबत बँक परिसरामध्ये जाऊन गुन्हेगारास ताब्यात घ्या, मी घटनास्थळी पोहोचतोच अशा सूचना दिल्या.

काकडे पीएसआय शिरसाट, कॉन्स्टेबल जाधव हेे त्या ठिकाणी पोहोचले, तर हातामध्ये शस्त्र घेऊन हा गुन्हेगार त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करत होता. तेवढ्यात सातव हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या गुन्हेगारास हातातील शस्त्र पोलिसांकडे देऊन सरेंडर हो अशा सूचना केल्या.

यावेळी त्यासाठी सातव यांनी त्याला पाचशे रुपये देतो असेही सांगितले. त्याने सातव यांच्याकडून पाचशे रुपयाची नोट घेतली आणि खिशामध्ये घातली परंतु शस्त्र देण्यास नकार दिला. त्याने धारदार शस्त्र सातव यांच्या अंगावर उगारला. यावेळी पोलीस कर्मचारी आढाव यांनी त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली.

सातव व कर्मचारी काकडे यांनी त्याच्या अंगावर झडप घातली. यादरम्यान त्यांने काकडे यांच्यावर शस्त्राने वार केला. उपअधीक्षक सातव यांच्या डाव्या हाताला तर पोलीस कॉन्स्टेबल काकडे यांच्या उजव्या हाताला जखम झाली. मात्र दोघांनी त्याला सोडले नाही त्याच्या हातातील शस्त्र काढून घेतले व यानंतर त्याची पोलीस कर्मचार्‍यांनी चांगलीच धुलाई करत जेरबंद करून पोलिस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल काकडे यांच्या फिर्यादीवरून विलास अबलूक्या काळे त्याच्यावर भादवि कलम 353 व 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या