Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : निरोगी शरीरासाठी सुकामेवा फायदेशीर

Video : निरोगी शरीरासाठी सुकामेवा फायदेशीर

नाशिक । विजय गिते | Nashik

गुलाबी थंडीचे दिवस सुरू झाले की,शरीर अधिकाधिक निरोगी कसे राहील याकडे प्रत्येक व्यक्तीचा कल असतो.सध्या शहर जिल्ह्यात गुलाबी थंडीचे प्रमाण हळूहळू वाढू लागले असून शरीर बळकटीसाठी व्यायामाबरोबरच पहाटे व सायंकाळच्या सुमारास धावणे व चालण्यासाठी मैदानावर गर्दी होऊ लागली आहे.

- Advertisement -

सुकामेवा खरेदीकडे सध्या वाढता कल दिसून येत आहे.काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, मनुके,सुके अंजीर यांसारख्या सुक्या मेव्याच्या सेवनाने विविध आजारांपासून रक्षण होते. सुक्या मेव्यात असणाऱ्या विशेष जीवनसत्त्वांचा आणि खनिजांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन रक्तातील साखर सुद्धा संतुलित होते. त्यामुळे याच्या सेवनावर विशेष भर दिला जातो.

सुका मेवा खाण्याची योग्य वेळ

सुकामेवा (Dry fruits) खाण्याची योग्य वेळ कोणती हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आहार तज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळची वेळ ड्राय फ्रुटस खाण्याची सर्वोत्तम वेळ आहे. ड्राय फ्रुट्सचा अधिकाधिक फायदा घेण्यासाठी, एक ग्लास पाणी आणि मूठभर भिजवलेल्या बदामाने तुमचा दिवस सुरू करा. अक्रोड, काजू किंवा तुम्हाला जे काही आवडते त्याने सुरुवात केली तरी चालेल. इतर वेळी कामात असताना किंवा गडबडीच्या वेळी सुका मेवा खाऊ शकता. यामुळे थकवा जाणवत नाही. रात्रीच्या वेळी दुधातून सुकामेवा खाणे देखील अधिक फायदेशीर ठरते.

सुका मेवा खाण्याचे फायदे

सकाळी सकाळी भिजवलेले काजू व बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढणे, हार्मोनल आरोग्य सुधारणे, ऊर्जा वाढणे, कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कमी होणे, वजन कमी होणे यांसारखे फायदे होतात. सुका मेवा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला आहे. ते रक्तातील साखर नियंत्रित करतात.खारकांमध्ये असणाऱ्या फायबर मुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

एका संशोधनानुसार रोज २० ग्रॅम सुकामेवा खाल्ला तर ह्रदयरोग, कर्करोग आणि इतर असाध्य रोगांचा धोका कमी होतो. नॉर्वेजियन युनिवर्सिटी आॅफ सायंन्स अँड टेक्नोलॉजी आणि इंपीरियल कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी जगभरात २९ शोधांचा अभ्यास केला. ज्यामध्ये ८ लाख जण सहभागी झाले होते. या शोधात समोर आले की, नियमित २० ग्रॅम काजू खाल्लेल्या लोकांमध्ये २० टक्के ह्रदयाचे विकार, १५ टक्के कर्करोग आणि २२ टक्के अकाली मृत्यू कमी होण्यास मदत मिळाली आहे. 

सुका मेवा खाण्याचे भरपूर फायदे आहेत. सुक्यामेव्याने शरीराला सूक्ष्म आणि पोषक तत्व मिळतात. अक्रोड आणि बदाम मुक्त रॅडिकल्स ( Free radicals) दूर करण्यास मदत होते व पेशींचे नुकसान देखील कमी होते. सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे डिंकाचे लाडू बनविण्यावर कडे सर्वांचा कळ आहे त्याप्रमाणे काजू बदाम पिस्ता डिंक गोडंबी मेथी आळीव खोबरे, गुळ वेलदोडे अशा विविध वस्तू घेण्याकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आमच्याकडे तयार लाडू ही डिंकाचे लाडू ही विक्री असून त्यालाही चांगली मागणी आहे.

पार्थ कारिया, गणेश ड्रायफ्रूट, वकिलवाडी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या