Friday, April 26, 2024
Homeनाशिकगायरान जमिनींचे होणार ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण

गायरान जमिनींचे होणार ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शासनाने जिल्हा यंत्रणेकडून संबंधित जागेवरील वनाच्छादीत भाग, तसेच त्यावर अवलंबून असलेले पशुधन (livestock), चराई क्षेत्र यासह विविध मुद्द्यांवर माहिती मागितली विषयावर अहवाल आहे.

- Advertisement -

संबंधित जागेवर चराई लागवड आहे का, यासह इतरही अनेक मुद्द्यांवर माहिती मागविली आहे. नाशिक महापालिकेनेही (Nashik Municipal Corporation) न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातील वृक्षांची गणना केलेली आहे, अशा अनेक मुद्द्यांचा आधार घेत प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन तसेच ड्रोन सर्वेक्षण (Drone survey) केले जाणार आहे. शहरातील पांजरपोळ जमिनीबाबत शासनाने अहवाल मागितला आहे.

त्यासाठी लवकरच पांजरपोळ जमिनीचे सर्वेक्षण (survey) करून अहवाल शासनाला पाठविला जाणार असल्याची माहिती जिल्हा यंत्रणेच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी (industrial development) जागा कमी पडत असल्याचा दावा करीत, शासनाकडे औद्योगिक विकासासाठी गायरान जमीन मागण्यात आली आहे. पर्यावरण (Environment) आणि पशुधन सांभाळ, असे मुद्दे पुढे करीत, पांजरपोळ संस्थेने जागा देण्यास विरोध केला आहे.

त्या अनुषंगाने शासनाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची समिती नेमून जिल्हाधिकाऱ्यांकडून या विषयी अहवाल मागविला आहे. शासनाने याबाबत अहवाल मागविला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेट देऊन तसेच, ड्रोन सर्वेक्षण करून शासनाच्या सूचनेनुसार अहवाल दिला जाईल,असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या