Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदेवळालीचे रस्ते ड्रोन कॅमेराच्या रडारवर

देवळालीचे रस्ते ड्रोन कॅमेराच्या रडारवर

देवळाली कॅम्प । Deolali Camp

शासनाने घोषित केलेल्या संचारबंदी ची देवळाली कॅम्प शहरात काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून, केवळ एकच रस्ता वाहतुकीची साठी खुला ठेवण्यात आला आहे. त्यावर देखील ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे

- Advertisement -

राज्यभरात वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या निणर्यानंतर शहरात सर्व प्रमुख रस्त्यावर पोलिसांनी तातडीने मध्यरात्रीनंतर बेरिकेटिंग केले आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शहरातील सर्व मुख्य मार्गाचे चित्रीकरण करण्यात येत आहे. सदर बाजार परिसरात प्रवेशाचे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून केवळ संसरी नाका मार्गे वडनेर रोडने प्रवेश देण्यात येत आहे.त

र लामरोडवरील भैरवनाथ मंदिर व रेस्ट कॅम्प रोडवरील नाका नं. २ येथे तंबू टाकण्यात आले असून येथे पोलीस व प्रशासकीय यंत्रणा मार्फत तपासणी केल्यानंतर नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील सर्व मार्ग बंद केल्याने नागरिकांना केवळ कोविड केअर सेंटर असलेल्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसमोरून ये-जा करता येणार आहे. यामुळे अनेक नागरिकांनी नेमकी गर्दी होणाऱ्या रस्ता सुरु ठेवल्याने पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या या अनोख्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

पेट्रोल साठी दोन कीमीचा फेरा

शहरातील हौसन रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी भगूर हुन येणाऱ्या नागरीक याना लॅम रोड, आनंद रोड,वडनेर रोड मार्गे हौसन रोड वर यावे लागेल,तर नाशिक रोड वरून भगूर कडे जाणारे नागरिक यांना आनंद रोड, वडनेर रोड मार्गे पेट्रोल भरून पुन्हा त्याच मार्गाने आनंद रोड संसरी नाक्यावर येऊन भगूर ला जावे लागेल. यात सर्वाना २ की मी चा फेरा करावा लागेल. या ऐवजी सद्या देवळाली कॅम्प च्या प्रवेशद्वार जवळ लावलेले बॅरिकेत हे पेट्रोल पंपा चे पुढे १० मीटर वर लावले तर नागरिकांची सोय होणार आहे.

ड्रोन कॅमेरातुन राहणार देवळालीच्या रस्त्यावर नजर #संचारबंदी सुरु,

रस्ते बंद

देवळाली कॅम्प(वार्ताहर):- शासनाने घोषित केलेल्या संचारबंदी ची देवळाली कॅम्प शहरात काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून,केवळ एकच रस्ता वाहतुकीची साठी खुला ठेवण्यात आला आहे व त्यावर देखील ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे

राज्यभरात वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने घेतलेल्या संचारबंदीच्या निणर्यानंतर शहरात सर्व प्रमुख रस्त्यावर पोलिसांनी तातडीने मध्यरात्रीनंतर बेरिकेटिंग केले आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शहरातील सर्व मुख्य मार्गाचे चित्रीकरण करण्यात येत आहे. सदर बाजार परिसरात प्रवेशाचे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून केवळ संसरी नाका मार्गे वडनेर रोडने प्रवेश देण्यात येत आहे.तर लामरोडवरील भैरवनाथ मंदिर व रेस्ट कॅम्प रोडवरील नाका नं. २ येथे तंबू टाकण्यात आले असून येथे पोलीस व प्रशासकीय यंत्रणा मार्फत तपासणी केल्यानंतर नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे . शहरातील सर्व मार्ग बंद केल्याने नागरिकांना केवळ कोविड केअर सेंटर असलेल्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसमोरून ये-जा करता येणार आहे यामुळे अनेक नागरिकांनी नेमकी गर्दी होणाऱ्या रस्ता सुरु ठेवल्याने पोलीस व कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या या अनोख्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

#पेट्रोल साठी 2 कीमी चा फेरा#

शहरातील हौसन रोड वर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी भगूर हुन येणाऱ्या नागरीक याना लॅम रोड, आनंद रोड,वडनेर रोड मार्गे हौसन रोड वर यावे लागेल,तर नाशिक रोड वरून भगूर कडे जाणारे नागरिक यांना आनंद रोड,वडनेर रोड मार्गे पेट्रोल भरून पुन्हा त्याच मार्गाने आनंद रोड संसरी नाक्यावर येऊन भगूर ला जावे लागेल यात सर्वाना 2 की मी चा फेरा करावा लागेल,या ऐवजी सद्या देवळाली कॅम्प च्या प्रवेशद्वार जवळ लावलेले बॅरिकेत हे पेट्रोल पंपा चे पुढे 10 मीटर वर लावले तर नागरिकांची सोय होणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या