Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशरशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला

रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रशियाच्या राष्ट्रपती कार्यालयावर ड्रोनने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली असून युक्रेनने (Ukraine) हा हल्ला केल्याचा आरोप रशियाने (Russia) केला आहे. तसेच या हल्ल्याच्या माध्यमातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही रशियाने केला आहे…

- Advertisement -

या हल्ल्याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला असून राष्ट्रपती कार्यालयावर ड्रोनने हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत क्रेमलिनकडून सांगण्यात आले की, दोन मानवरहित गाड्या क्रेमलिनच्या दिशेने आल्या. त्यावेळी हल्ल्यासाठी दोन्ही ड्रोन्स तयार होती. त्यामुळे नियोजित दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न करून रशियन राष्ट्राध्यक्षांना संपवण्याचा डाव होता असे क्रेमलिने म्हटले आहे.

धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शाळेत अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू

ड्रोनद्वारे पुतिन यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. तसेच कार्यालयाच्या घुमटावर मिसाईल आदळली असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीने हा व्हिडीओ शेअर केला असून पुतिन यांच्या कार्यालयावर हल्ला झाल्यामुळे रशियन सरकार अलर्ट झाले आहे. तसेच पुतिन यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

भारतात बेरोजगारीत वाढ; ‘या’ राज्याचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक

दरम्यान, या हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी रशियाने पुतीन यांच्यावर हायटेक ड्रोनने हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आज राष्ट्रपती कार्यालयावर ड्रोनने हल्ला केल्यामुळे रशियात खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या