Thursday, April 25, 2024
Homeजळगावरात्रीच्या प्रवासाची बंदी असतांना वाहने चालवणे पडले महागात

रात्रीच्या प्रवासाची बंदी असतांना वाहने चालवणे पडले महागात

रावेर|Raver | प्रतिनिधी-

अवजड सिमेंट मिक्सर मशीन असलेल्या वाहनांना सूर्यास्तानंतर रस्त्यावर चालण्याची परवानगी नसतांना देखील, प्रवास सुरूच ठेवला आणि आरटीओ तपासणी नाका असलेले मुख्य मार्ग सोडून चुकवे मार्ग वापरून प्रवास करणे वाहनधारकांना भलतेच महागात पडले आहे. अशी दोन वाहने जळगाव आरटीओ पथकाने रावेर येथे पकडून त्यांच्यावर जबर दंडात्मक कारवाई केली आहे.या कारवाईने अशा रीत्याने आरटीओ विभागाची फसवणूक करू पाहणाऱ्या वाहन धारकांना धक्का बसला आहे.

- Advertisement -

  सदरची कारवाई सोमवारी सायंकाळी झाली.ओव्हर डायमेन्शनल कन्साइनमेंट (ओडिसी) उल्लंघन झाल्याने जम्मू काश्मीर येथून बंगलोर जाणाऱ्या सिमेंट मिक्सर मशीन असलेले अवजड ट्रक जळगांव आरटीओ पथकाने कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.या ट्रकचा क्रमांक पीबी ३२ एल ९९९३ असून त्यावर ३१ हजार ५०० एवढा दंड ठोठावण्यात आला आहे तर दुसरा ट्रक क्रमांक एमएच १९ झेड ४९८५ हा ओव्हर लोड आढळून आल्याने त्याट्रक मालकाला २६ हजार दंड करण्यात आला आहे.

ओव्हर लोड वाहने चोरवड येथील आरटीओ नाका चुकवण्यासाठी पाल मार्गाचा वापर करत असल्याच्या तक्रारी असल्याने आरटीओ विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे.त्यात सोमवारी दोन वाहने आढळून आल्याने ५७ हजार ५०० दंड करण्यात आला आहे.हि कारवाई मोटर वाहन निरीक्षक नितीन जठार,सहा.मोटार निरीक्षक सचिन राठोड,नवनीत वळवी,सहा.मोटार वाहन निरीक्षक तुषार मोरे,सहा.मोटर वाहन निरीक्षक दीपक ढाकणे यांच्या पथकाने केली आहे.

आरटीओ नाका चुकवून ट्रक पास करून देण्यासाठी दलालांची टोळी कार्यरत 

चोरवड सीमा तपासणी नाका चुकवण्यासाठी पाल मार्गाचा वापर केला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सदरचा रस्ता दाखवण्यासाठी दलालाची टोळी कार्यरत असल्याचे बोलले जाते. ते नाक्याच्या आधी वाहन चालकांना हेरून काही रक्कम घेवून पाल मार्गे आणून सोडतात एक जण ट्रक मध्ये असतो तर त्याचा साथीदार मागे मोटार सायकल घेवून येत असतो. याबाबत आरटीओ विभागाने ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. ओव्हर लोड वाहनांच्या वाहतुकीने पाल रस्त्यांची चाळण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या