Friday, April 26, 2024
Homeनगरदारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या

दारूसाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

दारू पिण्यासाठी (Drink Alcohol) पैसे न दिल्याने 70 वर्षीय वृद्धाची हत्या (Murder of an old Man) करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.18) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील (Shrigonda City) बाजारतळाजवळ घडली आहे.

- Advertisement -

नामदेव सुनील भोसले असे खून करणार्‍या संशयिताचे नाव आहे. तर बापू विष्णू ओहोळ (70, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा हल्ली रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा) असे खून (Murder) झालेल्या वृद्धाचे नाव आहे. श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda Police) नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या याला ताब्यात घेऊन अटक (Arrested) केली आहे. त्याने इतर एका व्यक्तीला जखमी (Injured) केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री संशयित नामदेव सुनील भोसले हा ओहोळ यांच्या पाठिमागे लागून त्याने मयत ओहोळ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र ओहोळ यांनी पैसे नसल्याचे सांगत नकार दिला. याचा राग आल्याने सशंयित भोसेलेने ओहोळ यांच्या नाका-तोंडावर हाताने ठोसे मारून जखमी केले व गळ्याला कपड्याने आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना फरफटत नेऊन श्रीगोंदा नगर परिषदेच्या बंद गाळ्याच्या बाजुला लेंडी नाल्याजवळ झुडूपामध्ये नेऊन टाकले. पोलिसांनी संशयित नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या याला अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास सहायक पो.निरीक्षक दिलीप तेजनकर करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या